
no images were found
शिवाजी विद्यापीठात ग्यान कार्यशाळेचे आयोजन
कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र अधिविभागाच्यावतीने दि. 16 ऑक्टोबर, 2023 ते 20 ऑक्टोबर, 2023 या कालावधीमध्ये पाच दिवसीय ग्यान कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेचा उद्धाटन समारंभ सोमवार दि. 16 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी ठीक 10 वाजता राजर्षी शाहू सभागृहामध्ये संपन्न होत आहे. या उद्धाटन समारंभासाठी उद्धाटक म्हणून प्रा. डॉ. एम. एम. साळंुखे (माजी कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), अमेरिकेतील प्रा.डॉ.पी.व्ही.कामत व प्र-कुलगुरु प्रा. डॉ. पी.एस.पाटील हे प्रमुख अतिथी असून कुलगुरु प्रा. डॉ. डी. टी.शिर्के हे अध्यक्षस्थान भुषविणार आहेत. या कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणुन प्रा.डॉ.पी.व्ही.कामत असून त्याचसोबत प्रा.सतीश पाटील (इंडीयन इंस्टीटयूट ऑफ सायन्स), प्रा.संतोष हराम (पुणे विद्यापीठ), प्रा. डॉ.एस.डी.डेळेकर (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) हे मार्गदर्शन
करणार आहेत.
या कार्यशाळेमध्ये 'प्रगत कार्यात्मक पदार्थ किंवा संमिश्रे व त्यांचा वापर हरितऊर्जा तंत्रज्ञानासाठी' या विषयावरती हे सर्व तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेसाठी देशभरातून जवळपास शंभरहून अधिक संशोधक विदयार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. सदर कार्यशाळा ही इंडीयन इंस्टीटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर यांच्या सहकार्यातून शिवाजी विद्यापीठामध्ये संपन्न होत आहे. या कार्यशाळेचा समारोप शुक्रवार दि. 20 ऑक्टोबर, 2023 रोजी दुपारी ठीक 4 वाजता राजर्षी शाहू
सभागृहामध्ये प्रा. डॉ. आर.के. कामत (कुलगुरु, डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई) व प्र-कुलगुरु प्रा.पी.एस.पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे, अशी माहिती प्रभारी विभागप्रमुख प्रा. डॉ. के. डी. सोनवणे व ग्यान समन्वयक प्रा. डॉ.एस.डी.डेळेकरयांनी दिली.