Home शैक्षणिक शेवटचा मनुष्य जिवंत असेपर्यत फार्मसी क्षेत्राची गरज- कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल

शेवटचा मनुष्य जिवंत असेपर्यत फार्मसी क्षेत्राची गरज- कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल

0 second read
0
0
40

no images were found

शेवटचा मनुष्य जिवंत असेपर्यत फार्मसी क्षेत्राची गरज- कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल

कोल्हापूर (प्रतिनिधी ): भारतीय औषध निर्माण क्षेत्र अर्थात फार्मसी जगात अव्वल स्थानी असून या क्षेत्रात करिअरच्या अमर्याद संधी उपलब्ध आहे. पृथ्वीवर शेवटचा मनुष्य जिवंत असेपर्यत फार्मसी क्षेत्राची गरज भासणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यानी या क्षेत्रातील ज्ञान मिळवून आरोग्य क्षेत्रासाठी भरीव योगदान द्यावे असे आवाहन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ राकेश कुमार मुद्गल यांनी केले. डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या बी. फार्मसी व डी. फार्मसी विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात ते बोलत होते.

कुलगुरू डॉ राकेश कुमार मुद्गल यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या या समारंभाला परीक्षा विभाग प्रमुख डॉ. अभय जोशी, मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. राकेश शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. मुदगल यांनी फार्मसी अभ्याक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याचे स्वागत केले. विद्यापीठामार्फत चालवले जात असलेले विविध अभ्याक्रम, फार्मसीला जगात असलेले अव्वल स्थान या सर्व बाबींबद्दल सखोल माहिती दिली.
डॉ. अभय जोशी म्हणाले, विद्यार्थ्यांना यशाची उत्तुंग शिखरे गाठायची असल्यास कठोर परिश्रमाला पर्याय नाही. पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा सतत आढावा घ्यावा.
डॉ. राकेश शर्मा म्हणाले, फार्मसीच्या विद्यार्थ्याना मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या ज्ञानाचा व अनुभवाचा चांगला फायदा मिळेल.

प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे म्हणाले, आरोग्य यंत्रणेत फार्मासीस्टची भूमिका महत्वाची आहे. कोविड काळात भारतीय फार्मसी क्षेत्राला जगाला मोठा आधार दिला. जगात सर्वाधिक औषध निर्माण करणाऱ्या देशात भारतला महत्वाचे स्थान आहे. फार्मसी हे नोबल प्रोफेशन असून या क्षेत्रात काम करून रुग्णाचे आशीर्वाद मिळवण्याचेही पुण्य मिळते. डॉ. जंगमे यानी औषध निर्माण शास्त्र पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम, कार्यप्रणाली तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उदाहरणार्थ शैक्षणिक, सांस्कृतिक, तसेच क्रीडा यासारख्या उपक्रमाबद्दल विद्यार्थी व पालक यांना सविस्तर माहिती दिली.

सहाय्यक प्राध्यापक डॉ. केतकी धने यांनी गतवर्षी महाविद्यालयांमध्ये राबविल्या गेलेल्या विविध उपक्रम, एनएसएस, करिअर गायडन्स यासारख्या विविध विषयावरील मार्गदर्शनपर शिबिर आणि मुलांनी इतर कॉलेजमध्ये डॉ. प्रा. अभिनंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिळविलेल्या स्पर्धांमधील यश या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली.
सदर कार्यक्रमाचे नियोजणासाठी प्रा.सौ. स्नेहल कोरपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अक्षय पाटील, सौ स्नेहल कुलकर्णी, सौ वैष्णवी मंगरूळे, समृद्धी पाटील, जयकेदार पोरलेकर, संयुक्ता घाडगे, सुप्रिया चिमागावे व इतर शिक्षकेतर कर्मचारी कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमानंतर पालक व विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी कॉलेज, नर्सिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, रिसर्च सेंटर, लायब्ररी या विविध विभागांची भेट घडवून आणली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सोनाली निरंकारी व प्रा.मुस्कान सिंग यांनी केले तर आभार प्रा.अक्षय पाटील यांनी मानले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…