Home राजकीय पालकमंत्रिपद गेल्यामुळे भाजपचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी अस्वस्थ

पालकमंत्रिपद गेल्यामुळे भाजपचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी अस्वस्थ

4 second read
0
0
30

no images were found

पालकमंत्रिपद गेल्यामुळे भाजपचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी अस्वस्थ

 

पुणे: पुण्याचे ‘पालकमंत्रिपद गेले असले, तरी भाजपचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी अस्वस्थ होण्याचे काहीही कारण नाही,’ या शब्दांत पाटील यांनी आपल्या समर्थकांची समजूत काढली .

पाटील यांना पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून हटविल्यामुळे भाजपच्या गोटात नाराजी असून ‘ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढलो, त्यांनाच पदे मिळणार असतील, तर यापुढील काळात जिल्ह्यात पक्ष वाढणार कसा,’ असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.

 अजित पवार भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाल्यापासूनच पुण्याचे पालकमंत्री होणार, अशी चर्चा सुरू होती. पाटील यांना पालकमंत्रिपदावरून हटविण्याबाबत भाजपमधून मोठा विरोध होता.

पवार यांनी आपल्या गृहजिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळविण्यात बाजी मारल्याने शहर भाजपमध्येही अस्वस्थता होती.या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदारांशी चर्चा करताना पाटील यांनी ‘आपण पुण्याचे पालकमंत्री नसलो, तरी कायद्यान्वये सहपालकमंत्री आहोत,’ असेही त्यांनी उपस्थितांना बजावले. आपली कार्यपद्धती ‘जैसे थे’च राहणार असल्याचे नमूद केले.  त्यानुसार दर दोन महिन्यांनी शहरातील प्रश्नांसंदर्भात माहिती घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहरातील भाजपच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्याशी चर्चा केली. या आमदारांनाही त्यांनी पूर्वीप्रमाणेच कामकाज सुरू राहणार असल्याचे सांगितले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…