Home मनोरंजन २० ऑक्टोबरला येणाऱ्या बॉईज ४’ च्या  सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता

२० ऑक्टोबरला येणाऱ्या बॉईज ४’ च्या  सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता

1 second read
0
0
32

no images were found

२० ऑक्टोबरला येणाऱ्या बॉईज ४’ च्या  सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता

 

कोल्हापूर – बॉईज आर बॅक… बॉईज, बॉईज २, बॉईज ३ नंतर आता पुन्हा एकदा तुफान राडा घालायला ‘बॉईज ४’ सज्ज झाले आहेत. नुकताच ‘बॉईज ४’चा ट्रेलर लाँच सोहळा दणक्यात पार पडला. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ४’ची धमाल यावेळी चौपट वाढल्याचे दिसतेय आणि फक्त धमालच वाढली नसून धैर्या, ढुंग्या आणि कबीरच्या गँगमध्ये नवीन बॉईजही सहभागी झाले आहेत.
सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतीक लाड यांच्यासोबत ‘बॅाईज ४’ मध्ये आता ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखिल बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे दिसणार आहेत. याव्यतिरिक्त या चित्रपटात गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. कलाकारांची ही दमदार टोळी यंदा जबरदस्त धिंगाणा घालणार आहे. विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित, हृषिकेश कोळीलिखित या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत. एखाद्या चित्रपटाचे चार भाग येणे, असे मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच घडत आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रत्येक ‘बॉईज’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ट्रेलरवरून ‘बॉईज ४’ ही बॉक्स ऑफिस गाजवणार असल्याचे दिसतेय.
ट्रेलरवरून यावेळी धैर्या, ढुंग्या आणि कबीरमध्ये फूट पडल्याचे दिसतेय. आता ही दोस्ती कोणत्या कारणाने तुटली, धैर्या आणि ढुंग्या लंडनमध्ये काय करणार, त्यांचे पॅचअप होणार की हे अंतर अधिकच वाढणार, कबीरच्या आयुष्यात पुन्हा ग्रेस येणार? अभिनयची नेमकी भूमिका काय? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला २० ऑक्टोबरला चित्रपटगृहात मिळणार आहेत.
दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणाले, ” यावेळी बॉईज लंडनमध्ये धमाल करताना दिसणार आहेत. ट्रेलर पाहून याचा अंदाज आला असेलच. खरं सांगायचे तर माझ्यासह माझ्या टीमलाही खूप उत्सुकता लागून राहिली आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि सर्वांना तो आवडतोय. हाच मुख्य हेतू होता, की प्रेक्षकांचे मनोरंजन झाले पाहिजे. ‘बॉईज’ चा प्रत्येक भाग बनवताना हा पहिलाच भाग आहे, अशा पद्धतीनेच चित्रपट बनवण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळेच कदाचित दरवेळी तो प्रेक्षकांना भावतो. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हे शक्य आहे. त्यांनी या ‘बॉईज’ना भरभरून प्रेम दिले. शाळेपासून सुरू झालेला बॉईजचा हा प्रवास आता डिग्री कॉलेजपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या चित्रपटात अनेक नवीन गोष्टीही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. दरवेळी प्रमाणे हा ‘बॉईज’ ही एक नवीन गोष्ट घेऊन येणार आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…