Home औद्योगिक स्‍कोडा ऑटो इंडियाकडून उत्‍सवी किंमत व नवीन वैशिष्‍ट्यांनी युक्‍त नवीन प्रॉडक्‍ट ऑफेन्सिव्‍ह लाँच

स्‍कोडा ऑटो इंडियाकडून उत्‍सवी किंमत व नवीन वैशिष्‍ट्यांनी युक्‍त नवीन प्रॉडक्‍ट ऑफेन्सिव्‍ह लाँच

2 min read
0
0
33

no images were found

स्‍कोडा ऑटो इंडियाकडून उत्‍सवी किंमत व नवीन वैशिष्‍ट्यांनी युक्‍त नवीन प्रॉडक्‍ट ऑफेन्सिव्‍ह लाँच

 

कोल्हापूर, ( प्रतिनीधी ) : स्‍कोडा ऑटो इंडियाने भारतातील सर्वात सुरक्षित कार्सची उत्‍पादक म्‍हणून आपला दर्जा कायम ठेवत आणि प्रौढ व्‍यक्‍ती व मुलांसाठी ५-स्‍टार-रेटेड कार्सचा ताफा असण्‍यासह २०२३ मधील आपल्‍या उत्‍पादनामध्‍ये वाढ करणे सुरू ठेवले आहे. यावेळी सणासुदीच्‍या काळासाठी पोर्टफोलिओमध्‍ये व्‍यापक वाढ करण्‍यात आली असून आकर्षक उत्‍सवी कालावधी किंमत, कार्समध्‍ये अनेक नवीन वैशिष्‍ट्ये आणि ऑल-न्‍यू स्‍लाव्हिया मॅट एडिशन अशा सुविधा सादर करण्‍यात आल्‍या आहेत.

        सुधारित पोर्टफोलिओबाबत मत व्‍यक्‍त करत स्‍कोडा ऑटो इंडियाचे ब्रॅण्‍ड संचालक पीटर सोलक म्‍हणाले, आमच्‍या प्रॉडक्‍ट ऑफेन्सिव्‍हचा स्‍कोडा कुटुंबामध्‍ये अधिकाधिक ग्राहकांचे स्‍वागत करण्‍याचा आणि देशातील सणासुदीच्‍या काळात अधिक उत्‍साहाची भर करण्‍याचा मनसुबा आहे. आमचा ग्राहकांना नेहमी सर्वात सुरक्षित फॅमिली कार्स प्रदान करण्‍याचा आणि आमची उत्‍पादने व सेवांच्‍या माध्‍यमातून उच्‍च ग्राहक समाधानाची खात्री घेण्‍याचा प्रयत्‍न राहिला आहे. याच प्रयत्‍नांतर्गत या उत्‍सवी ऑफरिंग्‍ज सादर करण्‍यासह आमच्‍या उत्‍पादनांमध्‍ये सुधारणा करण्‍यात आल्‍या आहेत आणि आमच्‍या ग्राहकांना सर्वोत्तम मूल्‍य प्रदान करण्‍यात आले आहे.

उत्‍सवी ऑफर्स व वैशिष्‍ट्ये
कुशक व स्‍लाव्हियाची किंमत १०.८९ लाख रूपयांपासून आहे, जी सणासुदीच्‍या काळापुरती मर्यादित असेल. कुशक व स्‍लाव्हियाच्‍या टॉप-ऑफ-द-लाइन स्‍टाइल व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये नवीन वैशिष्‍ट्यांची भर करण्‍यात आली आहे, जसे ड्रायव्‍हर व ड्रायव्‍हरच्‍या बाजूच्‍या आसनावरील प्रवाशासाठी इलेक्ट्रिक सीट्स, जे सेगमेंट-फर्स्‍ट आहे आणि इल्‍यूमिनेटेड फूटवेल एरिया. डॅशबोर्डच्‍या मध्‍यभागी २५.४ सेमी इन्‍फोटेन्‍मेंट स्क्रिनसह स्‍कोडा प्‍ले अॅप्‍स आहेत. सिस्‍टम वायरलेस्‍ली अॅप्पल कारप्‍ले व अँड्रॉईड ऑटोशी कनेक्‍ट होते. तसेच कुशक व स्‍लाव्हियाच्‍या स्‍टाइल व्‍हेरिएण्‍ट्स मधील बूटमध्‍ये सबवूफर आहे. कुशक मॉण्‍टे कार्लोमध्‍ये देखील इलेक्ट्रिक सीट्स व फूटवेल इल्‍यूमिनेशनची भर करण्‍यात येईल.

स्‍लाव्हिया मॅट एडिशन
ही वैशिष्‍ट्ये ऑल-न्‍यू स्‍लाव्हिया मॅट एडिशनमध्‍ये देखील सादर करण्‍यात आली आहेत. या लिमिटेड-एडिशन सेदानला मॅट फिनिशमधील कार्बन स्‍टील पेंट देण्यात आला आहे. आकर्षक मॅट कार्बन स्‍टील आकर्षक डिझाइन सुधारणा जसे डोअर हँडल्‍स आणि डीप ग्‍लॉसी ब्‍लॅकमधील ओआरव्‍हीएम यासह कारला अधिक आकर्षक लुक देते. स्‍लाव्हिया मॅट एडिशनचे ग्राहक १.० व १.५ टीएसआय टर्बो पेट्रोल इंजिन्‍समधून निवड करू शकतात. कार्स ६-स्‍पीड मॅन्‍युअल, ६-स्‍पीड ऑटोमॅटिक आणि ७-स्‍पीड डीएसजी यांमधून निवड करण्‍याची सुविधा देखील देतात.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In औद्योगिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…