
no images were found
म.गांधी यांच्या शाश्वत विकासाच्या विचारानेच भारत महासत्ता बनेल : प्रा.संजय ठिगळे
कोल्हापूर(प्रतिनिधी ): एकविसाव्या शतकात म.गांधींच्या विचाराचे महत्व आहे,त्यांनी सांगितलेल्या शाश्वत विकासानेच भारत महासत्ता बनेल.असे प्रतिपादन कडेगाव येथील श्रीमती बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक संजय ठिगळे यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्रातील राज्यशास्त्र विषय व प्लेसमेंट सेल यांच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या “महात्मा गांधींच्या संकल्पनेतील भारत व शाश्वत ग्रामीण विकास” या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे होते.यावेळी उपकुलसचिव डॉ.एस.एम.कुबल,सी.एस.कोतमिरे सहा.प्राध्यापक एस.डी.भोसले,समन्वयक डॉ.एस.व्ही.माने उपस्थित होते.
प्रा.ठिगळे म्हणले की,निसर्गाकडे जा,त्याचे संवर्धन करा,खेड्याकडे चला,खरी सत्ता खेड्यात आहे.हा गांधीजींचा विचार महत्वाचा आहे.माणूस समाजप्रिय असला तरी तो निसर्ग प्रिय आहे.निसर्ग निर्मित व मानव निर्मित साधन संपत्ती चे जतन केले पाहिजे.हे म.गांधीना अभिप्रेत होते.अन्न, वस्त्र, निवारा,शिक्षण आरोग्य या मानवाच्या मुलभूत गरजा बरोबर संरक्षण ते ही पर्यावरणाचे संरक्षण महत्वाचे आहे.म.गांधीचे स्वप्न होते की,तळागाळातील माणसांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झाले पाहिजे. भारतातील वाढत्या लोकसंख्येची गुणवत्ता वाढविली पाहिजे,मानवी भांडवलाचे संवर्धन केल्यास म.गांधीच्या स्वप्नातील भारत निर्माण होईल.शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.तो कणा सध्या मोडलेला आहे,त्यासाठी वाढता चंगळवाद व बदलती जीवनशैली कारणीभूत आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या पासून परावर्त केले पाहिजे.श्रम संस्काराचे धडे घ्यावे लागतील.मन,मेंदू,आणि मनगट आणि कुशाग्र बुद्धी यानेच मानसिक मानसिक
दारिद्र दूर करणे महत्वाची आहे. जल साक्षरता,जल संस्कृती,जल संवर्धन,आर्थिक साक्षरता व डिजिटल साक्षरता या पंचसूत्रीनेच भारताचा शाश्वत विकास करता
येईल.असे प्रा.ठिगळे यांनी सांगितले. यावेळी प्रास्ताविक डॉ.के.बी.पाटील यांनी केले,पाहुण्यांची ओळख डॉ.एन.एस.रणदिवे यांनी करून दिली,सूत्रसंचालन सातारा विभागीय समन्वयक डॉ.एस.एल.गायकवाड यांनी केले. तर आभार समन्वयक डॉ.सी.ए.बंडगर यांनी मानले.