
no images were found
आजीवन अध्ययन विभागाच्या डॉ. सुमन बुवा यांचे दुःखद निधन
कोल्हापूर (प्रतिनिधीन ): शिवाजी विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागात २९ वर्ष कार्यरत असणाऱ्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. सुमन कृष्णा बुवा यांचे अल्पशा आजाराने बुधवार दि. ०४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी दुःखद निधन झाले. आजरा तालुक्यातील निंगुडगे हे डॉ. बुवा यांचे मूळ गाव. एम. एस. डब्लू. या विषयात
पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉ. बुवा यांनी समाजकार्य विषयातुन डॉक्टरेट मिळवली होती. त्यांनी राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पातळीवर शोधप्रबंध सादर केले होते तसेच विविध पुस्तकांचे लेखनही केले होते.
आज गुरुवार, दि. ०५ ऑक्टोबर रोजी सकाळी मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान सकाळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी विभागातील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. एका कर्त्यव्यदक्ष, मनमिळावू, विद्यार्थीप्रिय प्राध्यापकच्या जाण्याने विद्यापीठ वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.