no images were found
राज्यातील १२आमदार धनगर आरक्षणविरोध राष्ट्रपतींच्या दारी!
नवी दिल्ली: धनगरांना आदिवासी कोटय़ातून आरक्षण देण्यास राज्यातील आदिवासी आमदारांनी विरोध केला असून हा वाद आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत पोहोचला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष व आदिवासी नेते नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वाखाली १२ आदिवासी आमदारांनी बुधवारी मुर्मू यांची भेट घेतली.
यासंदर्भात तथ्यांचा अभ्यास करून केंद्र व राज्य सरकारला सूचना करण्याचे आश्वासन मुर्मू यांनी दिल्याची माहिती झिरवळ यांनी दिली. धनगरांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. त्यांना भटक्या विमुक्त प्रवर्गामधून ३.५ टक्के आरक्षणाचा लाभ मिळतो. या आरक्षणात वाढ केली तरी चालेल. धनगरांना आदिवासी कोटय़ातून नव्हे तर स्वतंत्र आरक्षण द्या. आदिवासींमध्ये धनगरांचा समावेश केला जाऊ नये, आमचे आरक्षण अबाधित राहिले पाहिजे, अशी मागणी मुर्मू यांच्याकडे केल्याचे झिरवळ यांनी सांगितले.