
no images were found
मुंबई डबेवाला संघटनेचे रघुनाथ मेडगे यांचे विद्यापीठात व्याख्यान
कोल्हापूर (प्रतिनिधी ) : शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट विभागामार्फत दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी ‘इंडक्शन प्रोग्रॅम’चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष श्री. रघुनाथ मेडगे हे प्रमुख व्याख्याते म्हणून लाभणार आहेत. विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. एस. देशमुख हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यविद्या सभागृह येथे हा कार्यक्रम सकाळी 11.00 वाजता होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटचे प्र- संचालक डॉ. नितीन माळी यांनी केले आहे.