no images were found
ऑक्टोबरमध्ये दोन ग्रहणे, दोन उल्का वर्षाव
अकोला – मोसमी वारे परतीला लागल्यानंतर आकाश निरीक्षण करणे अधिक सोयीचे होते. अशा वातावरणातच ऑक्टोबरमध्ये सूर्य व चंद्र अशी दोन ग्रहणे, दोन उल्का वर्षाव, ग्रहांच्या चंद्र व ताऱ्यांसोबत युती, ग्रहांचे उदयास्त आदींची रेलचेल खगोलप्रेमींसाठी असेल, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी दिली आहे.
पृथ्वीवरून पाच ग्रह, पाऊणेपाच हजार तारे आणि ८८ तारका समूह साध्या डोळ्यांनी सहज पाहू शकतो.
सध्या स्थितीत गुरु, शुक्र आणि शनी हे तीन महाग्रह आकाशात अतिशय विलोभनीय दर्शन देत आहेत. महिन्याच्या प्रारंभी बुध कन्या राशीत व शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल. ता. ३ ऑक्टोबर रोजी मंगळ ग्रहाचा पश्चिमेस अस्त,ता.६ ऑक्टोबरला रात्री ७ वा. इंटर नॅशनल स्पेसस्टेशन दर्शन, ता.७ ऑक्टोबरला बुध ग्रहाचा पूर्वेकडे अस्त होत आहे. ता.७, ८ व ९ रोजी रात्री ड्रेक्रोनिड तारका समूहातून आणि ता.२१, २२ रोजी मृग नक्षत्र समुहातून दरताशी वीस एवढ्या उल्का पडताना दिसतील. ता.१४ ऑक्टोबरला कंकणाकृती सूर्य ग्रहण आहे; पण भारतात ते दिसणार नाही. परंतू ता. २८ रोजी मध्यरात्री नंतर होणारे खंडग्रास चंद्रग्रहण सुमारे सव्वा तास बघता येईल.