no images were found
अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू – देवेंद्र फडणवीस
काही दिवसांपूर्वी अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवारांना भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिल्याने ते सरकारमध्ये सामील झाले, असा दावा महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदार लवकरच अपात्र ठरतील आणि मुख्यमंत्रीपदी अजित पवारांची वर्णी लागेल. पुढील सहा महिन्यात सर्व चित्र बदलेल, असा दावाही काही नेत्यांकडून केला जात आहे.
यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याबाबत मोठं वक्तव्य त्यांनी केलं. अजित पवारांना जेव्हा मुख्यमंत्री बनवायचं असेल तेव्हा त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू, असं सूचक वक्तव्य फडणवीसांनी केलं.