
no images were found
स्कोडा ऑटो इंडियाकडून कायलॅक श्रेणीच्या किमतींची घोषणा; आजपासून बुकिंगला सुरुवात
कोल्हापूर , : स्कोडा ऑटो इंडियाची सब-४ मीटर एसयूव्ही विभागातील पहिली वेईकल कायलॅक आता व्हेरिएण्ट्स व किमतींच्या संपूर्ण श्रेणीसह लाँच करण्यात आली आहे. कायलॅक आता क्लासिक, सिग्नेचर, सिग्नेचर+ आणि प्रेस्टिज या चार व्हेरिएण्ट पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. एसयूव्हीची सुरूवातीची किंमत कायलॅक क्लासिक ट्रिमसाठी ७.८९ लाख रूपये आहे. टॉप-ऑफ-द-लाइन कायलॅक प्रेस्टिज एटीची विक्री १४,४०,००० रूपयांमध्ये करण्यात येईल. तसेच, पहिल्या ३३,३३३ ग्राहकांना कॉम्प्लीमेण्टरी ३-वर्ष स्टॅण्डर्ड मेन्टेनन्स पॅकेज (एसएमपी) मिळेल. कायलॅकसाठी बुकिंग आज सायंकाळी ४ वाजल्यापासून सुरू होत असून डिलिव्हरीजना २७ जानेवारी २०२५ रोजी सुरूवात होईल. कायलॅकला आधीच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे, जेथे कायलॅक हँड-रेझर्स, कायलॅक क्लब सदस्यांकडून १६०,००० हून अधिक एक्स्प्रेशन्स आणि डिलर चौकशी मिळाल्या आहेत.
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पीटर जनेबा म्हणाले, ”नवीन कायलॅक भारतातील स्कोडा ब्रँडसाठी न्यू एराच्या आगमनाला सादर करते. स्कोडा कायलॅक आमच्यासह विभागासाठी देखील गेम-चेंजर ठरेल आणि ग्राहक अनुभवाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासोबत भारतीय रस्त्यांवर युरोपियन तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करेल. आम्ही पहिल्या ३३,३३३ ग्राहकांसाठी बेस्ट-इन-सेगमेंट मालकीहक्क अनुभवाची घोषणा केली आहे. कायलॅकने संपूर्ण २०२४ दरम्यान मोठा उत्साह आणि चर्चा निर्माण केली आहे, जी नोव्हेंबरमधील वर्ल्ड प्रीमियरसह अधिक वाढली. या एसयूव्हीमध्ये जागतिक डिझाइन पैलू, अद्वितीय ड्रायव्हिंग गतीशीलता, तडजोड न करणारी सुरक्षितता, अनेक वैशिष्ट्ये, एैसपैस व कार्यक्षम इंटीरिअर आहे, ज्याला पूरक श्रेणीमधील किंमत आहे. आम्हाला विश्वास आहे की कायलॅक नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याच्या, नवीन ग्राहकांना स्कोडा कुटुंबामध्ये आणण्याच्या आणि भारतातील आमची ब्रँड उपस्थिती प्रबळ करण्याच्या ध्येयाला अधिक दृढ करेल.”