
no images were found
कोल्हापूरचे नवे पालकमंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांची निवड
मुंबई : चंद्रकात पाटील यांची उचलबांगडी करत अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री बनवण्यात आले आहे तसेच कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी मंत्री हसन मुश्रीफ यांची वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी आज जाहीर केली. अजित पवार गटातील सात नेत्यांना पालकमंत्री बसवण्यात आले आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दबदबा दिसून येत आहे.आज शिंदे-फडणवीस सरकारने त्यांची ही नाराजी दूर केलीय.परंतु त्याचवेळी अजित पवार यांचे दबाव तंत्र यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.