Home देश-विदेश भारताचा कॅनडाला आणखी एक दणका

भारताचा कॅनडाला आणखी एक दणका

2 second read
0
0
44

no images were found

भारताचा कॅनडाला आणखी एक दणका

नवी दिल्ली : खलिस्‍तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्‍जरच्या हत्येबाबत कोणतेही पुरावे नसताना कॅनडाच्या पंतप्रधान जस्टिन ट्रूडो भारताचा यामध्ये हात असल्याचा सातत्याने आरोप करत आहे. आता भारताने ही नवी खेळी खेळत कॅनडावर मोठा पलटवार केला आहे.भारताने कठोर भूमिका घेत कॅनडाला आपल्या ४१ राजनयिकांना परत बोलावण्यास सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारताने कॅनडाला १० ऑक्टोबरपर्यंत ४१ राजनयिकांना परत बोलावण्यास सांगितले आहे. भारतामध्ये कॅनडाचे ६२ राजनयिक आहेत. तर कॅनडामध्ये असलेल्या भारतीय राजनयिकांची संख्या कमी आहे. त्यामुळेच भारताने कॅनडाला आपल्या राजनयिकांची संख्या कमी करण्यास सांगितले आहे. या प्रकरणावर भारत आणि कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Load More Related Articles

Check Also

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम कोल्हापूर/ प्रतिनिधी:-…