Home राजकीय लोकसभा निवडणुकीपूर्वीचा राजकीय धुरळा रंजक ठरणार-हेमंत पाटील

लोकसभा निवडणुकीपूर्वीचा राजकीय धुरळा रंजक ठरणार-हेमंत पाटील

1 min read
0
0
41

no images were found

लोकसभा निवडणुकीपूर्वीचा राजकीय धुरळा रंजक ठरणारहेमंत पाटील

मुंबई:देशात होवू घातलेली सार्वत्रिक निवडणूक अवघे काही महिन्यांवर येवून ठेपली असतांना राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश मध्ये होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे.लोकसभेपूर्वीचा हा राजकीय धुरळा त्यामुळे बराच रंजक ठरेल,असे प्रतिपादन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी केले.पंतप्रधानांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी आणि गांधी कुटुंबियांच्या भरवश्यावर कॉंग्रेस विधानसभेच्या रणसंग्रामात उतरेल.

लोकसभेचे गणित या निवडणुकांच्या निकालावर अवलंबून असल्याने सर्वच पक्षावर चांगली कामगिरी करण्याचा दबाब वाढला आहे.भाजप आणि कॉंग्रेस असा थेट सामना या राज्यांमध्ये असला तरी ही लढत इंडिया विरूद्ध एनडीए अशी होणार आहे. इंडिया आघाडीची एकी आणि प्रतिष्ठा देखील या निवडणुकीच्या अनुषंगाने पणाला लागली आहे.निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये पंतप्रधानांच्या सततच्या दौऱ्यामुळे आठवड्याभरात केंद्रीय निवडणूक आयोग या राज्यांच्या निवडणूका घोषित करेल, असे भाकित वर्तवले जात आहे.

राजस्थानमधील गहलोत सरकार आणि छत्तीसगड मधील बघेल सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी आणि मध्यप्रदेशात सत्ता वाचवण्यासाठी भाजप निवडणूक रिंगणात उतरणार आहे.राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये पक्षांतर्गत गटबाजी कॉंग्रेसची डोकेदुखी ठरू शकते.तर,मध्यप्रदेशातील सत्ते विरोधातील लहर सत्तांतर घडवून आणू शकते, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.याच निकालाच्या आधारावर आगामी लोकसभा निवडणुकीचे समीकरणे अवलंबून असतील,असे देखील पाटील म्हणाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कसबा बावडा लाईन बाजार येथील घनकचरा प्रक्रीया प्रकल्पावरील लोखंडी भंगार चोरी प्रकरणी कारवाई

कसबा बावडा लाईन बाजार येथील घनकचरा प्रक्रीया प्रकल्पावरील लोखंडी भंगार चोरी प्रकरणी कारवाई…