Home धार्मिक मणिपाल हॉस्पिटल तर्फे देणार बेसिक लाईफ सपोर्ट स्कील्स (बीएलएस) चे प्रशिक्षण

मणिपाल हॉस्पिटल तर्फे देणार बेसिक लाईफ सपोर्ट स्कील्स (बीएलएस) चे प्रशिक्षण

19 second read
0
0
23

no images were found

मणिपाल हॉस्पिटल तर्फे देणार बेसिक लाईफ सपोर्ट स्कील्स (बीएलएस) चे प्रशिक्षण

पुणे –  पुण्यातील मणिपाल हॉस्पिटल ने पुणे वाहतूक पोलिसांबरोबर सहकार्य करुन संयुक्त विद्यमाने पुणे वाहतूक पोलिसांना बेसिक लाईफ सपोर्ट स्कील्स चे प्रशिक्षण १००० वाहतूक पोलिस कर्मचार्‍यांना देण्याच्या उपक्रमाची सुरुवात केली आहे.  शहरात एकूण २३ ठिकाणी अपघाती ब्लॅक स्पॉट्स असून २०२३ च्या पहिल्या सहा महिन्यांत त्या ठिकाणांवर  ६३८ अपघात झाले व त्यापैकी १९२ जीवघेणे अपघात होऊन त्यांत २०२ जणांना जीव गमवावा लागला.  या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट्य म्हणजे पुण्यातील वाहतूक पोलिस कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देऊन तत्काळ प्रतिसाद देणे शक्य होईल कारण अपघात झाल्यावर आपात्कालीन स्थितीत सर्वप्रथम पोहोचणारे हे वाहतूक पोलिस कर्मचारी असतात.

या कार्यक्रमाच्या वेळी पुणे वाहतूक पोलिस विभागाच्या उपायुक्तांच्या हस्ते मणिपाल हॉस्पिटल्सच्या अद्ययावत अशा कार्डिॲक रुग्णवाहिकांचे अनावरण करण्यात आले.  मणिपाल हॉस्पिटल्स, खराडी आणि बाणेर येथील या रुग्णवाहिका विशेष अशा कार्डिॲक केअर उपकरणांनी युक्त असून मध्ये प्रशिक्षित कर्मचारी आणि आपात्कालीन औषधांचे तज्ञ असल्यामुळे योग्य वेळी लागणारी वैद्यकीय मदत लगेच उपलब्ध होऊ शकेल.  या रुग्णावाहिका हॉस्पिटल पासून १० किमीच्या परिघात कार्यरत असतील आणि त्या शहरातील अपघात होऊ शककतील अशा ठिकाणी उपलब्ध असतील.

पुणे वाहतूक पोलिस विभागाचे उपायुक्त श्री. विजयकुमार मगर  यांनी सांगितले “ आपात्कालीन परिस्थितीला हाताळण्यासाठी अधिकाधिक लोकांना तयार करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे बीएलएस ट्रेनिंग होय.  या भागीदारी मुळे पुणे वाहतूक पोलिस अधिक सक्षम होतील आणि शहरांतील लोकांना मदत करण्याचा त्यांचा आत्मविश्वास वाढेल, विशेष करुन रस्त्यावर अपघाताच्या काळात बसणार्‍या धक्क्यातून ते लवकर सावरु शकतील.  आमचा असा विश्वास आहे की या उपक्रमामुळे आपात्कालीन स्थितीतील प्रतिसादा मध्ये चांगला बदल घडू शकेल.  आम्ही पुण्यातील मणिपाल हॉस्पिटल चे या उपक्रमाला सहकार्य केल्या बद्दल आणि समाजाला आपात्कालीन स्थितीत मदत करण्यास आंम्हाला सहकार्य केल्या बद्दल आभार व्यक्त करतो.”

लाईफ सेव्हिंग्ज स्कील्स चे महत्त्व समजावून सांगतांना मणिपाल हॉस्पिटल, खराडी चे हॉस्पिटल डायरेक्टर श्री परमेश्वर दास यांनी सांगितले “ पुणे वाहतूक पोलिसांबरोबर सहकार्य करुन आम्ही मोठ्या प्रमाणावर लोकांना बेसिक लाईफ सपोर्ट सह या कौशल्यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यावर भर देत आहोत.  पुण्यातील मणिपाल हॉस्पिटल मध्ये आम्ही वर्षाला ५ हजारांहून अधिक हृदयरोगाशी संबंधित केसेसवर उपचार करतो आणि कार्डिॲक इमर्जन्सी रिस्पॉन्स मध्ये सुधारणा करण्याच्या आमच्या वचनबध्दते नुसार आम्ही कार्डिॲक ॲम्ब्युल्स सर्व्हिस सुरु केली आहे.” 

मणिपाल हॉस्पिटल्सखराडी आणि बाणेरचे क्लस्टर हेड श्री रमण भास्कर यांनी सांगितले “ वैद्यकीय आपात्कालीन समयी योग्य वैद्यकीय मदत मिळणे हे जीव वाचवण्यासाठी खूपच महत्त्वाचे असते.  या उपक्रमा मुळे आम्ही वाहतूक पोलिसांना बेसिक लाईफ सपोर्ट स्कील्स देऊन त्यांच्यात व समाजात बदल घडवण्यास वचनबध्द आहोत.  पुण्यातील इमर्जन्सी मेडिकल रिस्पॉन्स सक्षम करण्याच्या हेतूने दोन्ही हॉस्पिटल्स मध्ये २४X ७ इमर्जन्सी विभाग कार्यरत आहे.  या इमर्जन्सी विभागामध्ये अद्ययावत उपकरणे उपलब्ध असल्यामुळे अपघातामुळे धक्का बसलेल्या रुग्णांना आपात्कालीन उपचार देणे शक्य होते.”

मणिपाल हॉस्पिटल्स आणि पुणे ट्रॅफिक पोलिस यांच्यातील हे सहकार्य समाजाला सशक्त करण्यासाठी उचललेले सामायिक असे पाऊल आहे. यामुळे वैद्यकीय आपात्कालीन प्रतिसाद देणे अतिशय वेगवान होईल आणि त्यामुळे सर्वांसाठी वेगाने उपचार उपलब्ध होऊन पुणे शहर हे सुरक्षित शहर होऊ शकेल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…