no images were found
कामगार मंत्र्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा -राज्य प्रवक्ते संतोष पाटील
सांगली (प्रतिनिधी ): आज मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी मिरजेच्या सिविल हॉस्पिटलमध्ये भेट दिली.
आरोग्य पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरजेमध्ये महाराष्ट्राच्या सरकारी तिजोरीतील करोडो रुपये निधी देऊन गोरगरीब लोकांची जीवन वाहिनी म्हणून समजले जाणारे मिरज सिविल हॉस्पिटलमध्ये माणसावर उपचार केले जात नाही, परंतु भटक्या कुत्र्यावर उपचार केले जातात असे निदर्शनास आले आहे, कारण मिरज सिविल हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या वार्डमध्ये उपचार घेणाऱ्या खाटेवरती तीन-चार कुत्रे झोपले आहेत असे सोशल मीडियातून व्हायरल झाले होते.यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे आरोग्य मंत्री यांना जागतिक संघटनेचा आरोग्य पुरस्कार द्यावा म्हणून असे ट्विट केले होते. म्हणून आम्ही मिरज सिविल हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रत्यक्षात पाहणी केली ही गोष्ट आम्हाला खरी आहे हे समजल्यावर त्या ठिकाणी आम्ही सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व कामगार मंत्री व मिरजेचे विधानसभेचे आमदार राज्याचे कामगार मंत्री व पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना आरोग्य खात्यातील महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा म्हणून त्या ठिकाणी मागणी केली. यापुढे राज्य प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दिलासा मिळत नाही त्यांना जमिनीवर बसवून उपचार केले जातात,परंतु भटक्या कुत्र्यांना खाटेवरती उपचार केले जातात असे निदर्शनास आले यावेळेला राज्य प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले एकीकडे सांगलीच्या पद्मभूषण वसंत दादा पाटील सिविल हॉस्पिटल मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील व कर्नाटक, हैदराबाद येथून गोरगरीब रुग्ण येऊन उपचार घेत असतात मोठ्या संख्येने उपचार घेण्यासाठी रुग्ण येतात की रुग्णांना खटा पुरत नाहीत त्यांना जमिनीवर बसून उपचार द्यावे लागतात,परंतु मिरजेच्या आरोग्य पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या व पालकमंत्र्यांचा मतदारसंघ मध्येच सिविल हॉस्पिटल मध्ये माणसावर नाही पण कुत्र्यावर उपचार केले जातात हे निदर्शनात आले आहे म्हणून त्यांना महाराष्ट्र राज्याचा आरोग्य विभागातील महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा असे वक्तव्य केले आहे. या वेळेला स्वप्निल शेटे, सुशांत कदम, अनमोल पाटील, अक्षय पवार ,व अनेक जण पदाधिकारी उपस्थित होते