Home Uncategorized आयटीसी सनफीस्टने मुलांसाठी ‘सुपर एग अँड मिल्क’ पौष्टिक बिस्किट लाँच केले

आयटीसी सनफीस्टने मुलांसाठी ‘सुपर एग अँड मिल्क’ पौष्टिक बिस्किट लाँच केले

46 second read
0
0
20

no images were found

आयटीसी सनफीस्टने मुलांसाठी ‘सुपर एग अँड मिल्क’ पौष्टिक बिस्किट लाँच केले

 

नॅशनल: आयटीसी सनफीस्ट नेहमीच आपल्या ग्राहकांना काही नवीन आणि विशेष अनुभव देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या संदर्भात, आयटीसी सनफिस्टने आज हेन आणि काऊ यांच्यातील एक आगळ्यावेगळ्या कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. या कॉन्फरन्समध्ये त्यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, जिथे त्यांनी मुलांसाठी दूध आणि अंडी अधिक महत्वपूर्ण बनवण्याच्या आव्हानांवर विनोदीपणे प्रकाश टाकला आणि चांगले पोषण देण्यासाठी त्यांच्या योगदानावर भर दिला.

कॉन्फरन्समधील सर्वसाधारण चर्चेनंतर, एक मोठी पॅनेल चर्चा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही सहभाग घेतला. याठिकाणी उपस्थित असलेल्या मान्यवर व्यक्तींमध्ये श्री मदन मोहन मैती, चेअरमन, नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमेटी (एनईसीसी) पश्चिम बंगाल, डॉ. दुलाल चंद्र सेन, वाइस चेअरमन, आयडीए पूर्व विभाग, डॉ. अनन्या भौमिक, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि लाइफस्टाइल कन्सल्टन्ट, सेलिब्रिटी मॉम कोनिका बॅनर्जी, अर्चना सिन्हा, को – फाउंडर आणि सीईओ, नरिशिंग स्कूल्स उपस्थित होते. मुलांचा विकास होणाऱ्या वयामध्ये अंडी आणि दूध या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात यावर पॅनेलने भर दिला, कारण हे दोन्ही व्हिटॅमिन ए, डी, ई, लोह इत्यादीसह इतर अनेक पोषक घटकांसह प्रथिनांचे महत्वाचे स्त्रोत आहेत. मुलांसाठी दूध आणि अंड्याचे सेवन अधिक वाढवण्यासाठी नवीन मार्ग विकसित करण्याच्या पद्धतींवरही पॅनेलने चर्चा केली.

या चर्चेच्या आधारे आणि बाजारात अंडी आणि दुधापासून तयार होणाऱ्या बिस्किटांची कमतरता लक्षात घेऊन, ITC सनफीस्टने आज ‘गुडनेस ऑफ प्रोटीन’ सह आपले नवीन प्रोडक्ट सनफीस्ट ‘सुपर एग आणि मिल्क’ बिस्किट लाँच केले. हे बिस्किट आयटीसी च्या प्रोडक्ट डेव्हलपमेंट टीम ने अतिशय काळजीपूर्वक तयार केले आहे, जेणेकरून या खास बिस्किट मधून मुलांना पौष्टिकतेबरोबरच स्वादिष्ट, तोंडात विरघळणारा आणि सुपर क्रंचचा अनुभव मिळेल. यासोबतच, “सुपर कॉम्बो, सुपर टेस्टी” ही टॅगलाईन ‘गुड फॉर यू’ उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची ब्रँडची वचनबद्धता दर्शवते.

श्री अली हॅरिस शेरे, सीओओ, बिस्किट आणि केक्स क्लस्टर, ITC फूड्स, हे प्रोडक्ट लाँच करताना म्हणाले, “आमच्या ग्राहक संशोधनातून असे दिसून आले आहे की, आई त्यांच्या मुलांसाठी अंडी आणि दूध हे सर्वात महत्वाचे अन्न मानतात, परंतु, वैयक्तिकरित्या या गोष्टी मुलांना खाण्यासाठी फार सोयीस्कर पद्धतीने उपलब्ध नसतात. विशेषतः जेव्हा मुले घराबाहेर असतात. प्रत्येक मातांना ही पोषकतत्त्वे आपल्या मुलांना द्यायची असतात, परंतु सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही उत्पादनांमध्ये या दोन्ही गोष्टीं सहसा आढळून येत नाही. बाजारातील या कमतरतेमुळे आम्हाला हे दोन आवश्यक अन्न घटक बिस्किटच्या स्वरूपात आणण्यासाठी आमच्या प्रोडक्ट डेव्हलपमेंट टीमसोबत काम करण्याची प्रेरणा मिळाली. या नवीन उत्पादनाद्वारे आम्ही ते रोजच्या वापरासाठी अधिक सोयीस्कर बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. अंडी आणि दुधासह बिस्किटांचा पर्याय वेगवेगळ्या परवडणाऱ्या किमतीत सादर करणारी आयटीसी सनफिस्ट ही भारतातील पहिली कंपनी आहे.

सनफिस्ट अंडी आणि दुधाची बिस्किटे संपूर्ण दक्षिण आणि पूर्व भारतात 5 रुपये, 10 रुपये आणि 30 रुपये या किमतीत उपलब्धअसतील.आयटीसी मध्ये, बदलती जीवनशैली आणि ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन ग्राहकांना मूल्यवर्धित खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. आपल्या पोषण धोरणाचा एक भाग म्हणून ‘हेल्प इंडिया इट बेटर’ फ्रेमवर्क, अंतर्गत आयटीसी विज्ञान-आधारित, ग्राहकांच्या पसंतींवर-आधारित उत्पादन विकासाबरोबरच, कृषी क्षेत्रांमध्ये आपल्या मजबूत उपस्थितीचा फायदा घेत आहे, जेणेकरून ग्राहकांच्या गरजा पूर्ण करता येतील आणि त्यांना चांगल्या वस्तू निवडण्यात मदत करता येईल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…