no images were found
ब्राह्मणांवर बहिष्कार घालण्याचा लोधी समाजाचा शिवपुरी जिल्ह्यात निर्णय
शिवपुरी – मध्य प्रदेशात शिवपुरी जिल्ह्यात लोधी समाजाने ब्राह्मणांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. हे लोण आणखीही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. लोधी समाजाचे मोठे नेते प्रीतम लोधी यांनी काही दिवसांपूर्वी ब्राह्मणांबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यात ब्राह्मणांना विरोध सहन करावा लागत होता. ब्राह्मणांना खूश करण्यासाठी भाजपाने प्रीतम लोधी यांना पक्षातून निलंबित केले. त्यानंतर ओबीसी समाजाने मध्य प्रदेशात भाजपाच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. याच काळात प्रीतम लोथी यांच्या विरोधात काही पूजा करणारे, कथाकार, कीर्तनकारही बोलण्यास सुरुवात झाली. हे भाजपाचे समर्थक मानले जातात. आता ही लढाई दोन जातींवर येऊन ठेपली आहे. यात भारतीय जनतचा पार्टीची अडचण झाली आहे .
पूजा किंवा कर्मकांडांसाठी ब्राह्मणांना बोलावणार नाही. त्याचबरोबर काही ग्रामपंचायतींनीही हा निर्णय घेतला आहे की, जर कुणी घरी पूजेसाठी ब्राह्मणाला बोलावले तर त्याच्यावर पाच हजारांचा दंड आकारण्यात येईल. शिवपुरी जिल्ह्यात अनेक गावात अशी पत्रके वाटण्यात आली आहेत. या पत्रकावर लोधी समाजाती अनेकांनी स्वाक्षऱ्याही केलेल्या आहेत. सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल होते आहे. त्याच्यावरील तारीख जुनी आहे. मात्र या पत्रावरुन २३ ऑगस्ट रोजी काही गावांमध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी भिंड जिल्ह्यात प्रीतमसिंह यांच्या नेतृत्वात एक मोर्चा काढण्यात आला होता. त्यात पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. 2023 साली मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. प्रीतम लोधी यांना भाजपातून काढण्यात आल्यानंतर हा वाद वाढलेला दिसतो आहे. वाद वाढल्यानंतर भाजपा बॅकफूटवर गेल्याचे मानण्यात येते आहे.