no images were found
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कडून सत्कार
कोल्हापूर (प्रतिनिधी ): श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवीची कपिल तीर्थ जवळ पुजाऱ्यांची घरी असलेली मूर्ती करवीर संस्थानचे छत्रपती संभाजी राजे द्वितीय यांचे आज्ञेनुसार दि- 26 सप्टेंबर 1715 रोजी मूळ ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना सिद्धोजी घोरपडे गजेंद्र गडकर यांनी केली. या अनुषंगाने त्यांचा वंशज श्री यश राजे घोरपडे गजेंद्र गडकर ,तसेच विशाल प्रधान व निखिल प्रधान याचा सपत्नीक सत्कार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर यांच्या वतीने शाल, श्रीफळ, प्रसाद ,व श्रींचे वस्त्र देऊन माननीय सचिव तथाप्रांत सो सुशांत बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी देवस्थान व्यवस्थापक श्री महादेव दिंडे व कर्मचारी उपस्थित होते.