no images were found
न्यू वुमन्स मध्ये जागतिक फार्मसिस्ट दिन उत्साहात संपन्न
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिग हाऊस संचलित,
कोल्हापूर (प्रतिनिधी ): न्यु वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक फार्मसिस्ट दिन ऊसाहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करुन करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविकांमध्ये कॉलेजचे प्राचार्य डॉ.रविंद्र कुंभार यांनी संस्थेची वाटचाल, संस्थेने पुरविलेल्या विद्यार्थ्यासाठी सुविधा, अद्यावत उपकरणे व इतर सुविधा याचा मागोवा घेतला. तसेच फार्मसिस्ट दिनाचे महत्व विषद करुन शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे संचालक मा. श्री विनय पाटील सर यांनी विद्यार्थ्याना शुभेच्छा देवून फार्मसीच्या वाटचाली बद्दल तसेच सोई सुविधा व इतर उपक्रमाबाबत मार्गद्शन केले. संस्थेचे चेअरमन मा. श्री. के. जी. पाटील यांनी शुभेच्छा देताना आजवरची संस्थेची प्रगती, भविष्यातील वाटचाल तसेच समाजाचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी डॉक्टर बरोबरच फार्मासिस्टची भूमिका मह्त्वाची असून सामाजिक आरोग्याचा कणा फर्मासिस्टच आहे. विद्यार्थ्याना शिक्षनाबरोबरच सोई सुविधा देवून फार्मासीमधील एक दर्जेदार शिक्षण देणारे न्यू फार्मसी कॉलेज असेल व ते संस्थेचे नाव उंचावेल अशी आशा व्यक्त केली.
कार्यक्रमच्या प्रमुख पाहुण्या सौ. अंजोरी परांडेकर CEO, Opex & CiREE यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना फार्मसी हे एक जागतिक दर्जाचे उत्तम करिअर असून सुमारे 33 हून अधिक ठिकाणी फार्मसिला असलेल्या व्यवसायाच्या व नोकरीच्या संधी विषद केल्या. तसेच डीग्रीबरोबर इतर विविध कौशल्ये, सॉफ्ट स्किल, सद्याची इंडस्ट्रीची गरज त्यासाठी लागणारे इतर आवश्यक स्किल संपादन करावीत या विषयी मार्गद्शन केले.
या वेळी संस्थेचे व्हा. चेअरमन मा . श्री. डी.जी. किल्लेदार व फार्मसी कॉलेजमधील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. दिव्या शिर्के यांनी केले प्रमुख पाहुण्याची ओळख पुनम पाटील यांनी करून दिली व प्रा. पियुषा नेजदार यांनी सर्वांचे आभार मानले.