no images were found
शाहुपुरी पोलिसांकडून चोरीचा गुन्हा उघड ,सोन्याचे 7 तोळे दागिणे ,एक मोबाईल सह एकजण ताब्यात
कोल्हापूर ( प्रतिनीधी ): शाहूपुरी पोलीस ठाणे कोल्हापुर गु.र.नं. 541/2023 भा. द. वी. स कलम 379 प्रमाणे दाखल असलेला चोरीचा गुन्हा उघडीस आणण्यात शाहूपुरी पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकास यश आले. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. प्रताप विलास बागल (वय-50 रा.2 री गल्ली, उजळाईवाडी, ता. करवीर जि. कोल्हापुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 09/05/2023 रोजी दुपारी 3.30 वा चे सुमारास अश्विनी सतिश खांबे (वय-32 रा. इस्लामपुर ता. वाळवा जि. सांगली )हया मध्यवर्ती बस स्थानक कोल्हापूर येथे त्यांचा भाऊ सुमित पाटील यांच्या सोबत येवून कोल्हापूर ते इस्लामपुर जाणाऱ्या बसमध्ये फिर्यादी यांनी सिट पकडण्याकरीता खिडकीतून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असलेली बॅग आत मध्ये बसच्या सिटवरती ठेवली असता कोणीतरी अज्ञात इसमाने बॅग चोरली होती.या बाबत गुन्हाही नोंद झाला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असताना दिनांक 25/09/2023 रोजी शुभम संकपाळ व लखनसिंह पाटील यांना त्यांच्या गोपणीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक अज्ञात इसम चोरीचा मुद्देमाल घेवून स्वामी समर्थ मंदीर, रुईकर कॉलनी, कोल्हापूर येथे येणार आहे.त्या अनुशंगाने शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील अमंलदार यांनी सापळा लावला असता सदरचा संशयीत इसम स्वामी समर्थ मंदीर, रुईकर कॉलनी येथे एक इसम संशयीत रित्या फिरताना दिसला. त्यावेळी सदर इसमास ताब्यात घेवून त्याची झडती घेतला असता त्याच्या ताब्यात सोन्याचे दागिणे, रोख रक्कम व एक मोबाईल मिळून आला. त्यावेळी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर सदर इसमास विश्वासात घेवून अधिक विचारपुरस केली असता त्याने हे सोन्याचे दागिणे, रोख रक्कम व मोबाईल हा चार महिन्यापुर्वी मध्यवर्ती बस स्थानक कोल्हापूर येथे बसच्या खिडकितून हात घालून चोरी केला असल्याचे सांगितले.आरोपीच्या ताब्यातून 2,52,000/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत व उप विभागीय पोलीस अधिकारी अजीत टिके यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदशनाखाली पी. एस. आय प्रमोद चव्हाण, सहा फौजदार संदिप जाधव, पोलीस अंमलदार संजय जाधव, मिलीद बांगर, विकास चौगुले, शुभम संकपाळ , लखन पाटील, बाबासाहेब ढाकणे, रवी अंबेकर, महेश पाटील यांनी केली आहे.