no images were found
यूटीआय म्युच्यूअल फंड सांगली येथे नवीन वित्तीय केंद्र उभारणार
सांगली : देशातील सर्वात मोठ्या मालमत्ता व्यवस्थापकांपैकी एक, युटीआय अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने, त्यांच्या वितरण क्षेत्राची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी २९ नवीन वित्तीय केंद्र (फायनॅन्शिअल सेंटर) चालू करण्याची घोषणा केली. या सर्व कार्यालयांचे उद्घाटन २९ सप्टेंबर २०२३ रोजी, शुक्रवारी, एकाच वेळी केले जाईल. हे धोरणात्मक पाऊल युटीआयची त्यांच्या गुंतवणूकदारांना अधिक चांगली वित्तीय सेवा देण्याची व या सेवा सहज उपलब्ध करून देण्याची वचनबद्धता प्रतिबिंबित करते. यामुळे संपूर्ण भारतातील वित्तीय उद्योग क्षेत्रात त्यांची उपस्थिती अजून जास्त मजबूत होईल.
यूटीआय म्युच्यूअल फंडाने सांगली येथे नवीन यूटीआय वित्तीय केंद्र पहिला मजला, बिल्डिंग क्रमांक ५२४-ए, यूनिट क्रमांक १७. कृष्णायन बिझनेस आर्केड, जिल्हा परिषदेसमोर, मिरज रोड, जि. सांगली -४१६४१६ येथे चालू होणार असून या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक: ०२३३-२९९०५१० आहे.
यूटीआयचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. इम्तियाझर रहमान म्हणाले, आम्ही आमच्या गुंतवणूकदारांना सर्वसमावेशक सेवा व सुविधा अखंडपणे प्रदान करण्यासाठी आणि त्यांच्या अधिक नजीक जाण्यासाठी सातत्याने संपूर्ण देशभरात आमचे नेटवर्क वाढवत आहोत. विकसनशील अशा लहान व मध्यम शहरांमध्ये (नॉन मेट्रो), जेथे लोक गुंतवणूक करू इच्छितात, मोठ्याप्रमाणात वाढीची क्षमता आहे. त्यांचे म्युच्यूअल फंड गुंतवणुकीसंबंधीचे ज्ञान वाढविण्याचा आणि त्यांच्या शहरांमध्ये आमची उत्पादने उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या २९ नवीन कार्यालयांच्या माध्यमातून आर्थिक केंद्रांचा विस्तार हा आमच्या वित्तीय सेवा अधिक सुलभ व सोप्या करणे आणि त्या सर्वांना सहज उपलब्ध करून देणे या दृष्टिकोनाला पूरक आहे.
यूटीआय म्युच्यूअल फंड नेहमीच आपल्या वित्तीय केंद्रे, व्यवसाय विकास असोसिएट्स, म्युच्यूअल फंड वितरक आणि विविध बँकांसह भागीदारी या वितरण नेटवर्कच्या माध्यमातून गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असते.