no images were found
ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना यंदाचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर
मुंबई: माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बॉलिवूड गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांची यंदाच्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराच्या निवडी याबाबत घोषणा केली.हे जाहीर करताना मला खूप आनंद होत असून आणि सन्मानाची भावना आहे.”
“वहिदा रेहमान जी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल यावर्षीचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे असे सोशल मीडियावर माहिती शेअर करता ठाकूर यांनी असे म्हटले. त्यांनी वहिदा यांच्या कामगिरीचा गौरव करणारी एक लांबलचक पोस्टही सोशल मीडियावर शेअर केली आहे.
गेल्यावर्षी हा मान ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना मिळाला होता आणि आता वहिदा यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. अनुराग ठाकूर यांनी पुढे असे म्हटले की, “हिंदी चित्रपटांमधील भूमिकांसाठी वहिदा जी यांची नेहमीच समीक्षकांनी प्रशंसा केली आहे, त्यापैकी काही महत्त्वाचे सिनेमे म्हणजे ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘चौधवी का चाँद’, ‘साहेब बीवी और गुलाम’, ‘गाइड’, ‘खामोशी’ आणि इतरही अनेक. ५ दशकांहून अधिक काळाच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी त्यांच्या भूमिका अत्यंत चोखंदळपणे साकारल्या आहेत, ज्यामुळे रेश्मा आणि शेरा या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारप्राप्त वहिदा जी यांनी भारतीय नारीचे समर्पण, वचनबद्धता आणि सामर्थ्याचे उदाहरण दिले आहे, जी तिच्या कठोर परिश्रमाने व्यावसायिक उत्कृष्टतेची सर्वोच्च पातळी गाठू शकते.”