no images were found
मद्य विक्री प्रकरणी १०लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश
डेहराडून ::मद्य विक्री करताना अधिक शुल्क आकारल्या प्रकरणी हरिद्वारमधील दोघांनी मद्य विक्रीला करणाऱ्यांना न्यायालयात खेचले. संबंधित मद्य विक्रेत्यांना न्यायालयाने १० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
विजय कुमार आणि मोनू कुमार यांना दोन मद्य दुकान मालकांकडून प्रत्येकी ५ लाख रुपये मिळणार आहेत. संबंधित दुकानदारांनी या दोघांकडून व्हिस्की आणि बिअरच्या चार कॅनसाठी अनुक्रमे १० रुपये आणि २० रुपये जादा आकारले. मोनू आणि विजय यासाठी ऑनलाइन पेमेंट केले होते आणि त्यांनी एमआरपीपेक्षा जास्त रक्कम घेतल्याचा पुरावा त्यांच्याकडे होता. या दोघांनी हरिद्वारच्या ग्राहक मंचाचे दरवाजे ठोठावले. मद्य विक्रीवर अतिरिक्त पैसे घेतल्या सोबत मानसिक छळ केल्या बद्दल मद्यविक्रेत्यांना १० लाखचा दंड केला. या शिवाय खटल्याच्या खर्चासाठी १० हजार रुपयांचा दंड देखील केला.
विजयने आपल्या याचिकेत म्हटले होते की, त्याने या वर्षाच्या सुरुवातीला २ जानेवारी रोजी रामनगर भागातील सागर बडगोटी या एका इंग्रजी दारूच्या दुकानातून मद्य खरेदी केले होते. बाटलीची किंमत १७० रुपये होती पण त्याने १८० रुपये दिले. विजय प्रामाणेच मोनूने ४ एप्रिल रोजी चेदीलालच्या वाईन शॉपमधून चार बिअरचे कॅन विकत घेतले आणि त्याला आणखी २० रुपये द्यायला लावले. अतिरिक्त पैसे मोजल्याबद्दल मोनूचा संताप झाला होता.
दुकानांना पैसे परत करण्यासाठी चार संधी देण्यात आल्या मात्र ते अपयशी ठरले. ग्राहक न्यायालयाने सेवेत कमतरता आढळली सांगत दंड योग्य असल्याचे म्हटले. आदेशाच्या ३० दिवसांच्या आत नुकसान भरपाई न दिल्यास दोन्ही याचिकाकर्त्यांना केस दाखल केल्याच्या तारखेपासून या रकमेवर ६% व्याज मिळण्यास पात्र असेल असे नमूद केले आहे.