no images were found
मी निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य करेन: पवार
पुणे: ‘निवडणूक आयोग अंतिम निर्णय घेत असतो. आयोगापुढे सुनावणी होईल आणि त्यानंतर येणारा निकाल मी तरी मान्य करणार आहे,’ असे अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, शहराध्यक्ष दीपक मानकर, प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते. नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मुंबईत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासमवेत आहेत.
’ शरद पवार गटाकडून कारवाई करण्याबाबत चर्चा सुरू असल्याबाबत पवार म्हणाले, ‘ज्यांना ज्या काही गोष्टी करायच्या आहेत, त्या करू द्या. निवडणूक आयोग अंतिम निर्णय देत असतो. आयोगापुढे दोन्हीही बाजू मांडण्यात आल्या आहेत. आता सुनावणीदरम्यान दोन्ही गटांकडून आपापली भूमिका स्पष्ट करण्यात येईल. आयोगाकडून देण्यात येणारा निर्णय मी तरी मान्य करणार आहे.’
विधानसभा अध्यक्षांकडून निकाल देण्यात येणार असून, १६ आमदार अपात्र झाले, तर मुख्यमंत्रिपद मिळणार का, यावरही पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांत काहीही तथ्य नाही. एकनाथ शिंदे १४ महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून या चर्चा झडत आहेत, असे अजित पवार म्हणाले.
राज्यातील अनेक भागांत पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्यभर जोरदार पाऊस पडू दे. पाऊस पडला, की बळीराजा सुखी होतो आणि वातावरण बदलून जाते. राज्यातील कायदा-सुव्यवस्था चांगली राहू दे,