Home राजकीय मराठा,धनगर आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची दुटप्पी खेळी-हेमंत पाटील

मराठा,धनगर आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची दुटप्पी खेळी-हेमंत पाटील

1 min read
0
0
50

no images were found

मराठा,धनगर आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची दुटप्पी खेळीहेमंत पाटील


मुंबई : राज्यात सरकारविरोधात तयार झालेल्या अंसतोषावर मात करण्यासाठी सरकार कुटनीतीचा वापर करीत आहे.मराठा,धनगर आरक्षणासंदर्भात सरकारची न्यायालयातील आणि समाजाच्या प्रतिनिधींसमोरची भूमिका ही वेगवेगळी असून दुटप्पीपणाची आहे. सरकार विरोधातील लाट शमवण्यासाठीच आश्वासनांचा पाऊस पाडला जात असल्याचा धक्कादायक आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी मंगळवारी केला.

मराठा समाजाला  आरक्षणाचे आश्वासन आणि अनुसूचित जमातीत समाविष्ठ करू अशी ग्वाही धनगर समाजाला दिली जात आहे.पंरतु, ही पोकळ आश्वासने असून गोड बोलून सरकार राजकीय पोळी भाजत आहे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न सोडवत आहे, असे देखील पाटील म्हणाले.मराठा समाज हा आर्थिक दृष्ट्या मागास नसल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.त्यामुळे त्यांच्या आरक्षणाचा मार्ग सर्वोच्च न्यायालयानेच बंद केला आहे.तर, उच्च न्यायालयात राज्य सरकारकडून धनगर आरक्षणाविरोधात भूमिका घेतली जाते.पंरतु,या समाजाच्या नेत्यांसोबत होणाऱ्या बैठकीत एसटीच्या सवलती लागू करू असे आश्वासन सरकार देते. सरकारची ही दुटप्पी भूमिका दोन्ही समाजाच्या आंदोलकांच्या लक्षात आली आहे.अशात आरक्षण कुणालाही मिळणार नाही, असे भाकित देखील पाटील यांनी व्यक्त केले.

उपेक्षित समाजबांधवांना आरक्षण देण्याची इच्छा सरकारची असती तर ते कधीच लागू करण्यात आले असते.पंरतु, या दोन्ही आरक्षणाच्या मुद्दयावर गेल्या काही वर्षांपासून सरकारची वेळाकाढू भूमिका संशय निर्माण करणारी आहे. एकीकडे मराठा आणि धनगर आरक्षणाचा तिढा सुटत नसतांना उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मुस्लिम आरक्षणासंबंधीचा आढावा घेण्यात आला.मराठा आणि धनगर आरक्षणासह मुस्लिमांना देखील आरक्षण मिळावे, असे संघटनेची भूमिका आहे. पंरतु, अजित पवारांसारख्या जबाबदार राजकर्त्यांने आरक्षणासंबंधी राजकीय संभ्रम निर्माण करण्यासाठी ही खेळी खेळल्याचे पाटील म्हणाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…