
no images were found
राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश, खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून स्वागत
कोल्हापूर (प्रतिनिधी):-राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथल्या स्वर्गीय इंदिरा पाटील सहकारी दूध संस्थेच्या पदाधिकार्यांसह काही ग्रामस्थांनी, आज कॉंग्रेसला रामराम करून, भाजपमध्ये प्रवेश केला. कोल्हापुरातील भाजप कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत केले. सहकारी संस्था आणि गावच्या विकासासाठी कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली.
राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथल्या स्वर्गीय इंदिरा श्रीपतराव पाटील सहकारी दूध संस्थेचे अध्यक्ष आणि माजी प्राचार्य एस बी पाटील यांनी कॉंग्रेसची साथ सोडून, भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत सागर वागरे, युवराज पाटील, राहूल पाटील, दुलाजी पाटील, राजेंद्र मोहिते, बळवंत पाटील, कृष्णात पाटील, संजय पाटील, शामराव पाटील, दत्तात्रय पाटील, सौरभ सुतार, दिनकर पाटील, ऋतुराज काटकर आणि निवृत्त नौदल अधिकारी आर बी पाटील यांनी, भाजपमध्ये प्रवेश केला. खासदार धनंजय महाडिक यांनी या सर्वांचे स्वागत केले. योग्य वेळी आपण भाजपमध्ये प्रवेश केला असून, गावासह सहकारी संस्थांच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करू, तसेच भाजपमध्ये आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळेल, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, उपाध्यक्ष संभाजीराव आरडे, रवीश पाटील – कौलवकर यांनी मनोगतं व्यक्त केली. कार्यक्रमाला विजय महाडिक, प्रा. डी टी पुंगावकर यांच्यासह भाजपचे मंडल अध्यक्ष उपस्थित होते.