Home मनोरंजन ‘वागले की दुनिया’ मालिकेत सखी एका हिट-अँड-रन प्रकरणात अडकली  

‘वागले की दुनिया’ मालिकेत सखी एका हिट-अँड-रन प्रकरणात अडकली  

9 second read
0
0
19

no images were found

वागले की दुनिया मालिकेत सखी एका हिट-अँड-रन प्रकरणात अडकली

 

मध्यमवर्गीय कुटुंबातील दैनंदिन संघर्ष हलक्या-फुलक्या रूपात सादर करून सोनी सबवरील ‘वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से’ या मलिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आगामी भागांमध्ये सखी (चिन्मयी साळवी) एका अडचणीत सापडणार आहे. ती कार चालवत असताना रस्त्यावरील एक पोर अचानक तिच्या गाडीसमोर येते आणि दुर्घटना घडते. सखी हादरून जाते. त्या मुलाला तातडीने दवाखान्यात नेण्यात येते. पण या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्या पोराची आई सखीविरुद्ध पोलीसात तक्रार नोंदवते.

 

आगामी भागांमध्ये, वागले कुटुंबीय सखीच्या मदतीसाठी धावून जातात. हा अपघात झाला तेव्हा सखीने सिग्नलचे उल्लंघन केल्याचा आरोप पोलीस तिच्यावर करतात. हिट-अँड-रन प्रकरणाचा आरोप सखीवर करण्यात येतो आणि तिला अटक करण्यासाठी अधिकारी येतात. जखमी मुलाच्या आईवडीलांशी वागले कुटुंबीय चर्चा करतात. सखी त्या मुलाच्या वैद्यकीय खर्चाचा संपूर्ण भार उचलण्याची मनापासून तयारी दर्शवते. त्यांच्या मदतीसाठी आणखी काय करता येईल हे त्यांना विचारते. पण यावर त्या मुलाचे पालक जे सांगतात, ते ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो. ते सखीला विनंती करतात की, त्यांनी त्या जोडप्याच्या मुलासाठी सरोगेट मदर व्हावं. ते आणखी एका मुलासाठी बऱ्याच वर्षांपासून प्रयत्न करत असतात, जे विफल झालेले असतात. सखीने ही अट मान्य केल्यास ते केस मागे घेतील असे वचन देतात. या अनपेक्षित आणि भलत्या मागणीमुळे समस्त वागले परिवाराला धक्का बसतो. दरम्यान, अथर्व (शीहान कपाही) व्हायरल झालेला व्हिडिओ सगळ्या कोनांमधून बारकाईने तपासतो आणि खरोखर काय झाले आहे ते शोधून काढण्याचा प्रयत्न करतो.

 

अथर्वला त्या व्हिडिओमध्ये असे काही सापडेल का, ज्यामुळे सखीला मदत होईल? की तिला ही अकल्पनीय अट मान्य करण्यावाचून गत्यंतर राहणार नाही?

 

राजेश वागलेची भूमिका करणारा सुमित राघवन म्हणतो, “एक पिता म्हणून राजेश आपल्या मुलांच्या सुरक्षेविषयी खूप दक्ष आहे, खास करून ड्रायव्हिंगच्या बाबतीत. त्यामुळे जेव्हा हा अपघात घडतो, तेव्हा त्याला सर्वप्रथम चिंता आणि अविश्वास वाटतो. त्याला मनातून हे माहीत आहे की, सखी काही बेजबाबदार मुलगी नाही. पण पोलीस आणि पुरावे काही वेगळेच सांगू लागल्यावर मात्र तो हलून जातो. लहान मुलगा जखमी झाल्यामुळे राजेश आणि वंदना दोघांना अपार वाईट वाटते आहे आणि दवाखान्यात त्याची योग्य देखभाल व्हावी यासाठी दोघे सर्व प्रयत्न करण्यास तयार आहेत. पण, त्याच वेळी खरोखर रस्त्यावर काय घडले हे त्यांना जाणून घ्यायचे आहे आणि सखीला या गंभीर आपरोपातून सोडवायचे आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

७२ व्या राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेतील १२ खेळाडूंना खासदार महाडिक यांच्याकडून प्रत्येकी १० हजाराचं बक्षीस प्रदान

  ७२ व्या राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेतील १२ खेळाडूंना खासदार महाडिक यांच्याकडून प्…