Home राजकीय सातारा ते कागल महामार्गाच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनांकडून टोल वसुली करू नका, : धनंजय महाडिक 

सातारा ते कागल महामार्गाच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनांकडून टोल वसुली करू नका, : धनंजय महाडिक 

4 second read
0
0
42

no images were found

 सातारा ते कागल महामार्गाच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनांकडून टोल वसुली करू नका, : धनंजय महाडिक 

कोल्हापूर (प्रतिनिधी):सातारा ते कागल या महामार्गाचे काम रखडले आहे. शिवाय महामार्गावरील खड्डे, ठिकठिकाणी निर्माण झालेली बाह्य वळणे, यामुळे पुणे ते कोल्हापूर महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे दिव्य बनले आहे. अशा परिस्थितीत आज नवी दिल्लीत केंद्रीय सडक आणि परिवहन मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी आढावा बैठक घेतली. सातारा ते कागल महामार्गाचे रखडलेले काम आणि दुरावस्था लक्षात घेता, संबंधीत कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे आणि महामार्ग सुस्थितीत येईपर्यंत वाहनधारकांकडून टोल वसुली करू नये, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली.
सातारा ते कागल महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम गेले दोन वर्षे सुरू आहे. पण अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. सातारा ते कागल महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. वारंवार येणार्‍या बाह्य वळणांमुळे प्रवासाला प्रचंड वेळ लागत आहे. पावसाळ्यात तर सातारा ते कागल महामार्गाची भीषण अवस्था झाली होती. या पार्श्‍वभूमीवर आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी बैठक घेतली. त्याला राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी आणि खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. सातारा ते कागल महामार्गाचे काम प्रचंड रखडले असून, संबंधीत ठेकेदाराला ताबडतोब निलंबित करावे आणि नव्या सक्षम कंपनीकडे हे काम सोपवावे, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. तसेच जोपर्यंत महामार्गाचे काम दर्जेदार रित्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत वाहनधारकांकडून टोल घेवू नये, अशी मागणीही खासदार महाडिक यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान गेल्या सहा महिन्यात केवळ दोन टक्के काम केलेल्या संबंधीत ठेकेदारावर कारवाई सुरू केल्याचे नामदार गडकरी यांनी स्पष्ट केले. तसेच खासदार महाडिक यांनी केलेल्या मागणीबाबतही योग्य कार्यवाही करू, असे सांगितले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…