
no images were found
आमदार यड्रावकर यांचेकडूनशरण साहित्य अध्यासनासाठी एक लाखाचा निधी
कोल्हापूर, ( प्रतिनिधि ): शिवाजी विद्यापीठात सुरू होणाऱ्या शरण साहित्य अध्यासनाकरिता आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी एक लाख रुपयांचा प्रथम निधी प्रदान केला आहे.शिवाजी विद्यापीठाच्या दि. २५ मार्च २०२३ रोजी झालेल्या अधिसभेमध्ये विद्यापीठात शरण साहित्य अध्यासन स्थापन करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. सदस्य अभिषेक मिठारी यांनी हा ठराव मांडला होता. या शरण साहित्य अध्यासनाकरिता लोकवर्गणी जमा करण्याचे आवाहन कोल्हापूर लिंगायत समाज संस्थेने केले होते. संस्थेच्या या आवाहनाला तत्परतेने प्रतिसाद देत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडून १ लाख रुपयांचा प्रथम निधी देणगी स्वरूपात देण्यात आला. सदरचा निधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे आज सरलाताई पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
यापूर्वी एप्रिल २०२३मध्ये शरण साहित्य अध्यासनासाठी कोल्हापूर बसव केंद्रातर्फे विद्यापीठास अकरा हजार रुपयांची शरण साहित्य ग्रंथसंपदा भेट देण्यात आली आहे.आज निधी प्रदान प्रसंगी अधिसभा सदस्य अॅड. अभिषेक मिठारी, राजशेखर तंबाके, विलास आंबोळे, सी. व्ही. चौगुले, यश आंबोळे, दत्ता घुटुकडे आदी उपस्थित होते.