
no images were found
‘काव्या – एक जज्बा, एक जुनून’ मालिकेतून IAS अधिकारी स्त्रीची प्रेरणादायक आणि वेधक कहाणी
कोल्हापूर, – वर्तमान साचेबंदपणाला शह देऊन दमदार व्यक्तिरेखा असलेली वेधक कथानके सादर करण्यात सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन ही वाहिनी नेहमीच आघाडीवर असते. आता ही वाहिनी आपल्या प्रेक्षकांसमक्ष घेऊन येत आहे, काव्या या प्रेरणादायक व्यक्तिरेखेची आकर्षक कहाणी. काव्या एक IAS अधिकारी आहे आणि देशाची सेवा करून सामान्य माणसाला न्याय देण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे.
या मालिकेत टेलिव्हिजन अभिनेत्री सुम्बुल तौकीर खान शीर्षक भूमिका करत आहे. काव्या एक दृढनिश्चयी आणि ध्येयाने झपाटलेली स्त्री आहे, जिने IAS बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अवघड निर्णय घेतले आहेत. तिच्यासोबत या मालिकेत आहे, मिश्कत वर्मा, जो आदिराज प्रधानची भूमिका साकारत आहे. आदिराज स्त्री-शक्तीचा भोक्ता आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाविषयी त्याला मनापासून आदर आहे. सिव्हिल सर्व्हिस अकादमीतमध्ये त्याची ओळख काव्याशी होते. काव्याचा वाग्दत्त वर शुभम साकारला आहे, अनुज सुलेरे या कलाकाराने. काव्याविषयी आणि तिच्या IAS बनण्याच्या महत्त्वाकांक्षेविषयी आस्था असूनदेखील तो तिला त्या दोघांचे नाते आणि कारकीर्द यापैकी एकाची निवड करायला सांगतो. या पेचप्रसंगात काव्या आपल्या IAS अधिकारी बनण्याच्या ध्येयावर अढळ राहते आणि आपल्या महत्त्वाकांक्षेचा बळी न देता साखरपुडा तोडण्याचे धाडस दाखवते.