Home क्राईम दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात तीन वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी शहीद

दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात तीन वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी शहीद

4 second read
0
0
31

no images were found

दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात तीन वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी शहीद

श्रीनगर  — जम्मू  काश्मीर दहशतवाद्यांचा हैदोस सुरु आहे. काही अतिरेकी पाकिस्तानातून भारतातत घुसखोरी करतात आणि घातपाताचा डाव आखतात. पण त्यांचे कुकृत्यांचे डाव भारतीय सैन्य उधळून लावत आहे. अनंतनागच्या कोकरनाथ येथे गेल्या सहा दिवसांपासून हेच सुरु आहे. कोकरनाग येथे भारतीय सैन्य दल, पोलीस एकत्रितपणे दहशतवाद्यांच्या विरोधात शोध मोहीम राबवत होते. यावेळी दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात तीन वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी शहीद झाले. संबंधित घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याचा जिथे गोळाबार सुरु आहे तो परिसर पीर पंजाल डोंगरी भागात येतो. हा भाग मुजफ्फराबाद येथून किश्तवाडपर्यंत पसलेला आहे. जवळपास 170 किमीचा हा परिसर आहे. विशेष म्हणजे या परिसरात अनेक गुहा आहेत. याच गुहांमध्ये अतिरेकी लपून बसलेली असतात.

या गुहांमधून दहशतवादी सुरक्षा यंत्रणांवर हल्ला करुन घातपाताचा डाव घडवून आणला जाऊ शकतो. त्यामुळे ही लढाई सोपी नाहीय. सैन्याकडून ड्रोनच्या साहाय्याने मदत घेतली जात आहे. हे सर्च ऑपरेशन आणखी किती वेळ चालेल याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण गेल्या सहा दिवसांपासून हे ऑपरेशन सुरु आहे.

भारतीय सैन्याने आज सकाळी पुन्हा दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर सुरक्षा दलांना एक जळालेलं शरीर मिळालं आहे. मृतदेहावरील कपडे पाहिल्यानंतर ते मृतदेह दहशतवाद्याचंच असल्याचा भारतीय सैन्याचा दावा आहे. अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी आजसुद्धा ड्रोनची मदत घेण्यात आली. भारतीय सैन्याकडून अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे.

दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत भारतीय सुरक्षा यंत्रणेचे तीन बडे अधिकारी शहीद झाल्याने भारतीय सैन्य दलही आक्रमक झालंय. भारतीय सैन्य दलाकडून गेल्या सहा दिवसांपासून ‘ऑपरेशन गॅरोल’ सुरु आहे. दहशतवादी गॅरोल या गावात लपून बसले होते. त्यामुळे या ऑपरेशनचं नाव ऑपरेशन गॅरोल असं ठेवण्यात आलं आहे. या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्य दहशतवाद्यांना पळवून-पळवून यमसदनी पाठवत आहेत. यासाठी भारतीय सैन्य ड्रोन आणि रॉकेट लॉन्चरच्या मदतीने बॉम्बचे हल्ले करत आहे.

भारतीय सैन्य या दहशतवाद्यांचा शोध घेत आहे. या दहशतवाद्यांच्या विरोधातील गोळीबारात लष्करातील दोन बडे अधिकारी आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एका डीएसपी शहीद झाले आहेत. त्यामुळे भारतीय सैन्याचे जवान चांगलेच आक्रमक झाले आहेत.

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…