no images were found
घरगुती गौरी गणपती विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज
कोल्हापूर : घरगुती गौरी गणपती विसर्जनाकरिता महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. यामध्ये पवडी विभागाचे 225 कर्मचारी, आरोग्य विभागाचे 650 कर्मचारी व आरोग्य निरिक्षकांच्या 16 टिम, 90 टँम्पो 200 हमालासह, 10 डंपर, 24 ट्रॅक्टर ट्रॉली व 5 जे.सी.बी., 7 पाण्याचे टँकर, 2 रोलर, 2 बुम अशी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवानही विसर्जनस्थळी सुरक्षीततेसाठी साधनसामुग्रीसह तैनात असणार आहेत. तसेच विद्युत विभागाकडून विसर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात आली असून आरोग्य विभागाच्यावतीने विसर्जन ठिकाणांची साफसफाई करण्यात आली आहे. ठिकठिकाणी गणेशमुर्ती व निर्माल्य अर्पण/फेर विर्सजन करणेबाबत प्रबोधनात्मक फलक लावण्यात आले आहेत.
पंचगंगा नदी तसेच शहर परिसरातील तलावांचे प्रदूषण होऊ नये म्हणून महापालिकेच्यावतीने सदर ठिकाणी 180 गणेश विसर्जन कुंड, काहीली व निर्माल्य कुंडाची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विसर्जन मार्गावरील खराब झालेल्या रस्त्यांचे डांबरी पॅचवर्कचे कामही युध्द पातळीवर सुरु आहे. पवडी विभागाकडून नागरिकांनी अर्पण/फेर विर्सजन केलेल्या गणेशमुर्ती एकत्र करुन 90 टॅम्पोमधून वाहतूक करुन इराणी खणीमध्ये विसर्जीत करणेचे व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी अर्पण/फेर विर्सजन केलेले निर्माल्य गोळा करण्याचे काम करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने 16 आरोग्य निरिक्षकच्या टिम व एकटी संस्थेच्या 100 महिला सदस्य निर्माल्य संकलित करतील. यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने 650 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संकलित करण्यात आलेले निर्माल्य पुईखडी येथे स्वतंत्र खड्डा करुन सेंद्रीय खत तयार करण्यासाठी वापरले जाणार आहे. तरी शहरातील नागरिकांनी गणेशमुर्ती व निर्माल्याचे विसर्जन करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.