
no images were found
जिल्हयात पूरेसा खत साठा उपलब्ध :जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांगरे
कोल्हापूर : जिल्हयात सद्यस्थितीमध्ये (4 सप्टेंबर) युरिया 14997 मे.टन, डीअेपी 2405 मे.टन,एमओपी 2499 मे.टन, संयुक्त खते 14490 मे.टन व एसएसपी 5139 मे.टन अशी एकूण 39530 मे.टन खते उपलब्ध आहेत. तसेच, कृषि विभागाने महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांच्यामार्फत 2900 मे. टन युरिया, 531 मे. टन डीएपी बफर स्टॉक मधून वितरित केला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी दिली आहे.
“रासायनिक खते उपलब्ध नाहीत” अशा स्वरूपाच्या अफवांवर शेतकरी बांधवानी विश्वास ठेऊ नये. रासायनिक खताची खरेदी करताना काही तक्रारी असतील तर संबधीत तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी,पंचायत समिती यांचेकडे तक्रार नोंदवावी. शेतकऱ्यांनी तक्रारीसाठी राज्याचा 18002334000 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.गरजेनुरुप तक्रार नोंदविण्यासाठी जिल्हास्तरावर 9049454649 किंवा 7385990593 या नंबरशी संपर्क साधावा.रायायनिक खते खरेदी करताना ती अधिकृत, किरकोळ विक्रेत्याकडून पॉस मशीनवरून व खरेदीच्या पक्या पावतीसह खरेदी करावीत.
शेतकऱ्यांना कृषि सेवा केंद्रनिहाय उपलब्धता समजावी यासाठी कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांनी विकसीत केलेल्या ‘कृषिक’ ॲपची मदत घेता येते. तरी शेतक-यानी आपल्या मोबाईल मध्ये “कृषिक” ॲप डाऊनलोड करून घ्यावे. “कृषिक ॲप” मधील “खत उपलब्धता” या पर्यायावर क्लिक केल्यास कृषि केंद्रनिहाय खत उपलब्धता समजेल. आपल्या भागात कोणत्या किरकोळ विक्रेत्याकडे कोणत्या प्रकारचा किती खतसाठा त्या दिवशी उपलब्ध आहे यासाठी कृषि विकास अधिकारी,ज़िल्हा परिषद, कोल्हापूर यानी adozpkop.blogspot.com या ब्लॉगस्पॉट वर माहिती उपलब्ध करुन दिली आहे. या ब्लॉगस्पॉट वरुन देखील माहिती करून घ्यावे. जिल्हयात युरियासह सर्व ग्रेडची खते उपलब्ध असून, नवीन खते उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही सुरु आहे, असे देखील जालिंदर पांगरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कोल्हापूर यांनी कळविले आहे.