Home आरोग्य स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी: प्रत्येक पालकांनी जाणून घ्यावी अश्या दुर्मिळ आजाराची माहिती – वोक्हार्ट हॉस्पिटल्सचा महत्त्वाचा संदेश डॉ. अमित भट्टी, न्यूरॉलॉजिस्ट व स्ट्रोक स्पेशालिस्ट

स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी: प्रत्येक पालकांनी जाणून घ्यावी अश्या दुर्मिळ आजाराची माहिती – वोक्हार्ट हॉस्पिटल्सचा महत्त्वाचा संदेश डॉ. अमित भट्टी, न्यूरॉलॉजिस्ट व स्ट्रोक स्पेशालिस्ट

5 min read
0
0
146

no images were found

स्पायनल मस्क्युलर अट्रॉफीप्रत्येक पालकांनी जाणून घ्यावी अश्या दुर्मिळ आजाराची माहिती – वोक्हार्ट हॉस्पिटल्सचा महत्त्वाचा संदेश
डॉअमित भट्टीन्यूरॉलॉजिस्ट  स्ट्रोक स्पेशालिस्ट

कधी तुम्ही अशा मुलाला पाहिलंय काजो आपल्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे बसूउभं राहू किंवा चालू शकत नाहीकिंवा एखादं बाळजे खूपच सैल वाटते आणि हातपाय अपेक्षेप्रमाणे तितकेसे हलवत नाहीही लक्षणे  सुरुवातीला केवळ वाढीतील उशीर वाटू शकतातपण कधी कधी त्या स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी (एसएमएनावाच्या गंभीर आनुवंशिक आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी असू शकतातहा असा आजार आहेज्याबद्दल प्रत्येक पालककाळजी घेणारे आणि आरोग्यसेवकांनी माहिती ठेवणे गरजेचे आहेकारण लवकर निदान झाल्यास मुलाचं आयुष्य बदलू शकते.

स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी (एसएमएहा दुर्मिळ पण गंभीर आनुवंशिक आजार आहेजो स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता कमी करतोइतर आजारांप्रमाणे हा संसर्ग किंवा दुखापतीमुळे होत नाहीतर आईवडील दोघांकडून दोषपूर्ण जनुक (जीनमुलामध्ये आल्यामुळे होतोहा आजार असलेल्या मुलांमध्ये पाठीच्या कण्यात असलेल्या मोटर न्यूरॉन्स नावाच्या स्नायूंना चालना देणाऱ्या मज्जापेशी हळूहळू नष्ट होऊ लागतात आणि स्नायूंना संदेश पाठवणं थांबवतातत्यामुळे स्नायू हळूहळू कमकुवत होत जातात आणि वाया जाऊ लागतातयालाच मसल अट्रॉफी म्हणतातहा आजार बहुतेक वेळा लहान बाळांमध्ये आणि मुलांमध्ये दिसतोपण काही वेळा त्याची लक्षणे मोठेपणीसुद्धा दिसू शकतात.

वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे सिनियर न्यूरॉलॉजिस्ट आणि स्ट्रोक स्पेशालिस्ट डॉअमित भट्टी सांगतात, “स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी हा असा आजार आहे ज्यामध्ये वेळ म्हणजेच स्नायूंचे आयुष्यजितक्या लवकर आपण तो ओळखतोतितक्या प्रभावीपणे आपण त्याआजारावर नियंत्रण ठेवू शकतो आणि मुलाचे जीवनमान जपू शकतोउशिरा निदान झाल्यास झालेलं नुकसान भरून काढता येत नाही.” म्हणूनच पालक आणि बालरोग तज्ज्ञांनी त्याची लक्षणे ओळखणे खूप महत्त्वाचं आहे.

स्पायनल मस्क्युलर अट्रॉफीची बाळांमध्ये दिसणारी काही सुरुवातीची लक्षणे म्हणजे हातपायांची हालचाल कमी होणेशरीर खूप सैल (floppy) वाटणेमान नीट  धरता येणेगिळताना किंवा श्वास घेताना अडचण होणेमोठ्या मुलांमध्ये पालकांना जाणवू शकते की मुलाला स्वतः बसणेउभं राहणे किंवा चालणे कठीण जातेकिंवा तो वारंवार पडतोखेळताना/धावताना लवकर दमतोही लक्षणे कधीही “सामान्य शारीरिक वाढीतील उशीर” म्हणून दुर्लक्ष करू नयेतअशी कुठलीही लक्षणे दिसल्यास लगेचच बालरोग न्यूरॉलॉजिस्टचा सल्ला घ्यावा.

एसएमए मध्ये लवकर निदानाचे महत्त्व शब्दांत सांगता येणार नाहीगेल्या काही वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात एसएमएच्या उपचारात मोठी प्रगती झाली आहे आणि आता भारतातसुद्धा काही अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेतपण हे उपचार तेव्हाच जास्त परिणामकारक ठरतात जेव्हा ते उपचार अगदी सुरुवातीलाच सुरू केले जातात काही वेळा तर मुलामध्ये लक्षणे  दिसण्याआधीचसाध्या जनुकीय रक्ततपासणीतून एसएमए आहे की नाही हे निश्चित करता येते.

सुदैवाने आज एसएमए साठी असे उपचार उपलब्ध आहेत जे या आजाराने प्रभावित कुटुंबांना खऱ्या अर्थाने आशा देतातत्यातील सर्वात आशादायक म्हणजे जीन थेरपीविशेषतः झोलगेन्स्मा नावाचे औषधहे एकदाच दिले जाणारे इंट्राव्हेनस इंजेक्शन असून यात दोषपूर्ण जनुकाची (जीनआरोग्यदायी प्रत दिली जातेज्यामुळे आजाराची प्रगती थांबवण्याचा प्रयत्न होतोइतर मंजूर औषधांमध्ये रिसडिप्लाम (तोंडावाटे घेण्याचं औषधआणि नुसिनरसेन (पाठीच्या मणक्यातील द्रवात दिले जाणारे इंजेक्शनयांचा समावेश होतोही औषधं शरीरात मोटर न्यूरॉन्ससाठी (हालचाल नियंत्रित करणाऱ्या मज्जा पेशींच्या जगण्यासाठीआवश्यक असलेले प्रोटीन जास्त प्रमाणात तयार होण्यासाठी मदत करतातया उपचारांमुळे जगभरातील अनेक मुलांना पुन्हा ताकद मिळालीचालण्याची क्षमता सुधारली आणि अधिक काळचांगल्या गुणवत्तेचेआनंदी  समाधानकारक जीवन जगू शकले.  

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…