no images were found
एचडीएफसी बँक आणि विनफास्ट ऑटो इंडिया यांच्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या ऑटो व इन्व्हेंटरी फायनान्सिंगसाठी करार
मुंबई,: भारतातील अग्रगण्य खाजगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँक आणि विनफास्ट ऑटो इंडियाने भारतातील ग्राहक आणि अधिकृत डीलर्सना ऑटो व इन्व्हेंटरी फायनान्सिंग देण्यासाठी सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. विनफास्ट ऑटो इंडिया ही व्हिएतनाम मधील सर्वात मोठ्या खाजगी समूह विनग्रुप’चा भाग असलेल्या जागतिक स्तरावरील इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी विनफास्टची उपकंपनी आहे. भारतीय बँकेसोबतचा हा विनफास्टचा पहिला करार असून, भारतातील त्यांच्या लाँचपूर्वी ग्राहकांना कर्जसुविधा सुलभपणे उपलब्ध करून देणे हा त्यामागचा उद्देश आहे.
या भागीदारीचा उद्देश ग्राहक आणि डीलर्ससाठी सर्वसमावेशक फायनान्सिंग पर्याय उपलब्ध करून देणे आहे, ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदीची प्रक्रिया अधिक सोयीस्कर होईल. या कराराअंतर्गत, ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार फायनान्सिंग सुविधा मिळेल, ज्यामुळे अधिकाधिक भारतीय ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक वाहन घेणे परवडणारी आणि सोयीस्कर होईल.
या भागीदारीमुळे विनफास्टला एचडीएफसी बँकेच्या संपूर्ण भारतभर पसरलेल्या ब्रांच नेटवर्क आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून शहरांपासून ते वाढत्या बाजारांतील ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल. तसेच, ही भागीदारी भारतातील शाश्वत वाहतुकीच्या वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेला अधिक बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
विनफास्ट आपल्या व्हीएफ 6 आणि व्हीएफ 7 या मॉडेल्सच्या लाँचसाठी तयारी करत असताना, या कराराअंतर्गत तयार करण्यात आलेल्या खास सुविधा कंपनीच्या सर्व वाहनांवर लागू होतील. हा करार विनफास्ट आशियाचे सीईओ श्री. फाम शान चाउ आणि एचडीएफसी बँकेचे बिझनेस हेड – ऑटो लोन, इन्व्हेंटरी फायनान्स आणि टू-व्हीलर लोन विभागाचे श्री. अखिलेश कुमार रॉय यांनी स्वाक्षरी करून केला. या प्रसंगी विनफास्ट आणि एचडीएफसी बँकेचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या कराराबद्दल बोलताना श्री. अरविंद वोहरा, ग्रुप हेड – रिटेल अॅसेट्स, ग्रामीण आणि एसएलआय बँकिंग ग्रुप, एचडीएफसी बँके म्हणाले, “इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी फायनान्सिंगची भूमिका महत्त्वाची आहे. विनफास्टसोबतचा हा करार हा त्या दिशेने आणखी एक पाऊल आहे आणि यामुळे ग्राहकांना विनफास्टची दर्जेदार वाहने सोप्या फायनान्सिंग पर्यायांद्वारे घेता येतील. ग्राहकांच्या स्वप्नांची पूर्तता सोप्या आणि सोयीस्कर पद्धतीने करण्याच्या दिशेने बँकेच्या मोठ्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.”
विनफास्ट आशियाचे सीईओ श्री. फाम शान चाऊ म्हणाले, “हा करार भारतातील ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक वाहनप्रवास अधिक सर्वसमावेशक, सोयीस्कर आणि भविष्यकालीन बनवण्याच्या आमच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. एचडीएफसी बँकसारख्या विश्वासार्ह बँकेसोबतची भागीदारी याची खात्री देते की आम्ही केवळ उत्कृष्ट उत्पादने आणि सेवा देत नाही, तर आमच्या ग्राहकांना आणि डीलर भागीदारांना प्रत्येक टप्प्यावर सहाय्य करणारी मजबूत आर्थिक व्यवस्था देखील तयार करत आहोत.”
हा करार विनफास्टच्या भारतात मजबूत आणि ग्राहककेंद्रित उपस्थिती निर्माण करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अधोरेखित करतो.एचडीएफसी बँकेच्या रिटेल अॅसेट्स विभागात ऑटो लोन हा एक महत्त्वाचा घटक आहे. 30 जून 2025 पर्यंत बँकेचे ऑटो लोन पोर्टफोलिओ 1.48 लाख कोटी रुपयांहून अधिक होते.