
no images were found
निवडणूक प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘स्वीप’ समिती स्थापन
कोल्हापूर : निवडणूक प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने स्वीप कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय स्वीप समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती उप जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी दिली आहे.
लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने निवडणूक प्रक्रियेत नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग घेण्याच्या हेतूने स्वीप आराखडा तयार करुन त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनाचे विभाग, शासकीय, अशासकीय संस्था, सर्व विभागांच्या सहकार्यातून विविध उपक्रमांव्दारे मतदारांमध्ये जागरुकता निर्माण करुन निवडणूक प्रक्रियेत त्यांना मोठ्या संख्येने सामावून घेण्यात येणार आहे. याबरोबरच जास्तीत जास्त मतदार नोंदणी वाढविण्याच्या उद्देशाने स्वीप समिती गठीत करण्यात आली आहे. समिती सदस्यांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आगामी वर्षात होणाऱ्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर स्वीप आराखडा तयार करुन त्याची अमंलबजावणी करावी, अशा सूचना श्री. रेखावार यांनी दिल्या आहेत.