Home मनोरंजन गीता कपूरने सांगितली सोनाली बेंद्रेला नृत्य दिग्दर्शन केल्याची आठवण

गीता कपूरने सांगितली सोनाली बेंद्रेला नृत्य दिग्दर्शन केल्याची आठवण

5 second read
0
0
56

no images were found

गीता कपूरने सांगितली सोनाली बेंद्रेला नृत्य दिग्दर्शन केल्याची आठवण

या शनिवारी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील द कपिल शर्मा शो या तुमच्या लाडक्या शोमध्ये मनमुराद हसण्यासाठी सज्ज व्हा. इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 3 चे परीक्षक सोनाली बेंद्रे, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस तसेच मोहक होस्ट जय भानुशाली या भागाची शोभा वाढवणार आहेत. त्यांची चटपटीत उत्तरे आणि कपिल शर्माच्या अतरंगी परिवाराचे हास्य-विनोद प्रेक्षकांना भरपूर हसवतील. या भागाला आपल्या परफॉर्मन्सने चार चाँद लावतील, इंडियाज बेस्ट डान्सर सत्र 3 चे काही स्पर्धक – नोरबू, सुश्मिता तमांग आणि शिवम वानखेडे.

इंडियाज बेस्ट डान्सरच्या बाबतीतील सर्वात चांगली गोष्ट कोणती या कपिल शर्माच्या प्रश्नाचे उत्तर देताना प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूर म्हणाली, “मला ऑडिशन्समध्ये सगळ्यात जास्त मजा येते. एकापेक्षा एक अशा प्रतिभावान डान्सर्सला बघण्याचा आणि त्यांच्याशी परिचय करून घेण्याचा रोमांच भारी असतो! त्यातून अगदी सुरुवातीलाच स्पर्धक आणि परीक्षक यांच्यात छान नाते तयार होते. खूप धमाल येते. स्पर्धा अटीतटीची होते, तेव्हा मग गांभीर्य वाढत जाते. पण त्यामुळे ऑडिशन हा स्पर्धेतील माझ्या आवडता टप्पा आहे. एलिमिनेशन तर फारच क्लेशदायक असतात, मला ते अजिबात आवडत नाही. पण, सध्या माझ्यापेक्षा जास्त भावुक झालेली आणखी एक व्यक्ती आमच्या पॅनलमध्ये आहे, ती म्हणजे सोनाली बेंद्रे मॅम. ती भावुक झाली, की आणखीनच गोड दिसते.”

कपिल कुतुहलाने गीता कपूरला विचारताना दिसेल की, तिने कधी सोनाली बेंद्रेसोबत काम केले आहे का? त्याला उत्तर देत गीता कपूर उत्साहाने म्हणाली, “होय, आम्ही यापूर्वी एकत्र काम केले आहे. मी तिला एका गंभीर टप्प्यात बघितले आहे. ती जेव्हा सेटवर असते, तेव्हा तिचे चित्त अगदी एकाग्र असते. सेटवर आल्या-आल्या ती तालिम सुरू करते, कारण आपले काम तिला चोख करायचे असते. आत्ताही मी एक परीक्षक म्हणून तिच्या शिजरी बसले आहे, तर मला ह्याची सारखी जाणीव होत आहे की, मी सोनाली मॅमच्या शेजारी बसले आहे.”

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रत्येकांचे ‘एकला चलो रे’! इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचा दावा

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रत्येकांचे ‘एकला चलो रे’! इंडिया अगेन्स्ट …