
no images were found
भगवान महावीर अध्यासनास प्रा. डॉ. श्री राजेंद्र बी पाटील यांची बृहत देणगी
प्रा. डॉ. श्री राजेंद्र बी पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या प्रस्तावित इमारत बांधकामासाठी 1 लाख रु. अशी बृहत देणगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. डी टी शिर्के यांचेकडे सुपूर्द केली. या प्रसंगी मा.प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील तसेच मा. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, डॉ. नेमिनाथ शास्त्री (बाहुबली विद्यापीठ) व डॉ. बी डी खणे उपस्थित होते. डॉ. श्री राजेंद्र बी पाटील हे शिवाजी विद्यापीठाचे समाजशास्त्र विभाग माजी विभाग प्रमुख व भगवान महावीर अध्यासनाचे माजी समन्वयक आहेत. सदर बृहत देणगी बद्दल मा. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, मा. प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील तसेच मा. कुलसचिव व्ही. एन. शिंदे व वित्त व लेखा अधिकारी श्री अजित चौगुले यांनी प्रा. डॉ. श्री. राजेंद्र aपाटील यांचे अभिनंदन केले. भगवान महावीर अध्यासनाच्या भव्य इमारत बांधकामास सर्व दानशूर, अहिंसा प्रेमी व्यक्ति व संस्थांनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन डॉ. विजय ककडे, प्राध्यापक भगवान महावीर अध्यासन, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. यांनी केले आहे. सदर देणगी आयकर सवलतीस (100 %) पात्र आहे. सदर देणगी ऑ नलाईन व स्कॅन कोड ने देणेची सुविधा उपलब्ध आहे.