Home शासकीय दुरुस्तीच्या कामामुळे सोमवारी पाणी पुरवठा बंद

दुरुस्तीच्या कामामुळे सोमवारी पाणी पुरवठा बंद

50 second read
0
0
68

no images were found

दुरुस्तीच्या कामामुळे सोमवारी पाणी पुरवठा बंद

कोल्हापूर  : महावितरणमार्फत चंबुखडी सबस्टेशन येथील 110 के.व्ही.मुख्य लाईनच्या दुरुस्तीच्या कामामुळे सोमवार, दि.11 सप्टेंबर 2023 रोजी विजपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. यामुळे शिंगणापूर योजनेवरून नळकनेक्शन धारकांना दैनंदिन होणारा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तर मंगळवार, दि.12 सप्टेंबर 2023 रोजी होणारा दैनंदिन पाणीपुरवठा अपूरा व कमी दाबाने होणार आहे.

            यामध्ये ए बी वॉर्ड अंतर्गत पाण्याचा खजिना वितरण शाखा, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, मंगेशकरनगर, मिरजकर तिकटी, भारत डेअरी परिसर, संभाजीनगर, मंडलिक वसाहत, तिकोणे गॅरेज, किर्ती हौसिंग सोसायटी, कोळेकर तिकटी, पोतणीस बोळ, शाहू बँक परिसर, कोष्टी गल्ली, प्रॅक्टीस क्लब, वारे वसाहत, साळोखेनगर, बापुरामनगर, महाराष्ट्रनगर, सुर्वेनगर, प्रथमेशनगर, शिवगंगा कॉलनी, प्राध्यापक कॉलनी, वाल्मिकी आंबेडकरनगर, राधे कॉलनी, शांती उद्यान, इंगवले मळा, आई कॉलनी, कात्यायणी कॉम्प्लेक्स परिसर, राजीव गांधीनगर, जरगनगर, गंजीमाळ, रामानंदनगर, नाळे कॉलनी, विजयनगर परिसर, जुनी मोरे कॉलनी, नवी मोरे कॉलनी, वर्षानगर, भारतनगर, सुभाषनगर पंपींगवरील ग्रामीण भाग, पाचगाव, आर.के.नगर, पुईखडी, जिवबा नाना, विशालनगर, आयसोलेशन, वाय.पी.पोवार नगर, वर्षा विश्वास, शिव-स्वरूप कॉलनी, पोस्टल कॉलनी, आर.के.नगर, जरगनगर लेआऊटचा समावेश आहे. तर ई वॉर्ड अंतर्गत राजारामपुरी वितरणण संपूर्ण राजारामपुरी, शाहूमिल, वैभव हौसिंग सोसायटी, ग्रीनपार्क, शांती निकेतन, रेव्हेन्यु कॉलनी, अरूणोदय, राजेंद्रनगर, चौगुले हायस्कुल परिसर, सम्राटनगर, प्रतिकानगर, इंगळेनगर, दौलतनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ, नवश्या मारुती चौक, दत्तगल्ली, यादवनगर, कामगार चाळ, पंत मंदीर परिसर, जगदाळे कॉलनी, महावीर नगर, अश्विनीनगर, जागृतीनगर, पायमल वसाहत, अंबाई डीफेन्स, राजाराम रायफल, काटकर माळ. ई वॉर्ड कावळानाका लोणार वसाहत, शाहुमिल कॉलनी, राजीव गांधी वसाहत, महाडीक वसाहत, रूईकर कॉलनी, लिशा हॉटेल, शिवाजी पार्क, फ्रेंड्स कॉलनी, शाहुपूरी व्यापारपेठ, शाहुपूरी 1 ते 4 गल्ली, साईक्स एक्स्टेन्शन, पाच बंगला इत्यादी भागातील नागरीकांना पाणी पुरवठा होणार नाही. तरी या भागातील नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

घराला पूर्णत्व देणाऱ्या बाईची हृदयस्पर्शी कथा ‘बाई तुझा आशीर्वाद’

घराला पूर्णत्व देणाऱ्या बाईची हृदयस्पर्शी कथा ‘बाई तुझा आशीर्वाद’ मराठी मालिका विश्वात नेह…