no images were found
ए.डी. सायंटिफिक इंडेक्सच्या क्रमवारीत शिवाजी विद्यापीठाचे ९६ संशोधक
कोल्हापूर : जागतिक पातळीवरील संशोधकांची क्रमवारी ‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स-२०२३’ नुकतीच जाहीर करण्यात आली. या जागतिक संशोधकांच्या अद्यावत क्रमवारीत शिवाजी विद्यापीठातील कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह एकूण ९६ वैज्ञानिक, संशोधकांचा समावेश झालेला आहे. प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांचा एच इंडेक्स विद्यापीठात सर्वाधिक ८४ इतका आहे.
अमेरिकेतील मिशीगन विद्यापीठामार्फत हा निर्देशांक सन २०२१ पासून दरवर्षी जाहीर करण्यात येत आहे. पहिल्या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठातील संशोधकांनी या यादीमध्ये स्थान प्राप्त केले आहे. सन २०२१मध्ये ४८, सन २०२२ मध्ये ८०, मार्च २०२३मध्ये ९२ आणि आता ९६ अशा चढत्या क्रमाने विद्यापीठातील संशोधकांची या यादीमधील संख्या वाढत राहिली आहे.
अमेरिकेच्या मिशीगन विद्यापीठातील प्रा. मूरत आल्पर आणि प्रा. सिहान डॉजर या दोघांनी संयुक्तपणे ‘आल्पर-डॉजर सायंटिफीक इंडेक्स’ तथा ‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स’ विश्लेषित केलेला आहे. त्यासाठी त्यांनी गुगल स्कॉलरवरील संशोधकांचा गेल्या पाच वर्षांतील एच-इंडेक्स, आय-टेन इंडेक्स हे निर्देशांक तसेच सायटेशन स्कोअर (उद्धरणे) इत्यादी बाबींचे पृथक्करण केले. एकूण ५५ देश, १०,८८६ विद्यापीठे आणि ४ लाख ४ हजार २२८ शास्त्रज्ञांच्या संशोधकीय कामगिरीचे विश्लेषण करून एच इंडेक्स, आय १० इंडेक्स आणि सायटेशन इत्यादी शास्त्रीय निकषांवर व्यक्ती आणि संस्थांची उत्पादकता आणि कार्यक्षमता यांचे मूल्यांकन केले जाते.
या रँकिंगमध्ये शिवाजी विद्यापीठातील एकूण ९६ संशोधक-प्राध्यापकांचा समावेश झाला आहे. गुगल स्कॉलर सायटेन्शनच्या आधारे काढण्यात आलेल्या निर्देशांक यादीत गेल्या वर्षीच्या संशोधकांनी आपले स्थान कायम राखले आहे. या यादीत प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांचा सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ असा उल्लेख करण्यात आलेला आहे. क्रमवारीत रसायनशास्त्र १३, पदार्थ विज्ञान १०, जैवरसायनशास्त्र ५, इलेक्ट्रॉनिक्स ३, पर्यावरण शास्त्र ३, फूड सायन्स २, वनस्पती शास्त्र ३, प्राणीशास्त्र ९,संख्याशास्त्र १, गणित १, नॅनो व तंत्रज्ञान ३, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान ७, मानव्यशास्त्र आणि भाषा विभाग ६.