no images were found
अभिनेत्री श्रध्दा आर्यने वैयक्तिक आवडीनुसार सजवला आपल्या व्हॅनिटी व्हॅनचे इंटिरिअर
प्रसारणास प्रारंभ केल्यापासूनच ‘कुंडली भाग्य’ मालिकेने प्रेक्षकांना मोहवून टाकले आहे. ‘बालाजी टेलिफिल्म्स’ची निर्मिती असलेल्या या मालिकेतश्रध्दा आर्य (प्रीता), शक्ती आनंद (करण), मनित जौरा (ऋषभ), पारस कलनावट (राजवीर), सना सय्यद (पालकी) आणि बसीर अली (शौर्य) या लोकप्रिय कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या कौटुंबिक मालिकेच्या कथानकाने अनेक भावभावना जागृत केल्या असून मानवी नातेसंबंधांतील गुंतागुंतीचा वेध घेतला आहे.
कुंडली भाग्यच्या सेटवरील सततच्या प्रखर दिवे आणि कॅमेर््यामुळे आपल्या व्हॅनिटी व्हॅनद्वारे आपल्या शालीन आणि उच्चभ्रू अभिरुचीची कल्पना इतरांना यावी, असा कुंडली भाग्यतील अभिनेत्री श्रध्दा आर्यचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. आता तिला तिच्या व्हॅनिटी व्हॅनची सजावट तिच्या आवडीनुसार करण्याची संधी मिळाली तेव्हा तिने या व्हॅनचे रुपांतर आपल्या ऊबदार छोटेखानी घरकुलात करून टाकले आहे. आत गेल्यावर ती अगदी निवांत होते. तिचा बहुतांशी वेळ सेटवरच जात असला, तरी आपल्याला एका खास जागेची गरज आहे, हे तिला जाणवत होते. तिने व्हॅनमधील जेवणाच्या विभागापासून सजावटीचा प्रारंभ केला. तिथे तिने जेवणाचे टेबल मांडले आणि तो कोपरा मंद दिव्यांच्या रोषणाईने सजविला. श्रध्दाला पुस्तके वाचायलाही आवडतात. तेव्हा तिने आपली पुस्तके ठेवण्यासाठीही आत जागा तयार केली. तिथे ती आपल्या प्रसंगांचे संवादही पाठ करू शकते.
श्रध्दा आर्य म्हणाली, “तुम्ही घरातच निवांत असता. पण मालिकेच्या सेटसारख्या या वर्दळीच्या जागी माझी व्हॅनिटी व्हॅन हीच माझी आरामाची एकमेव जागा बनली आहे. या व्हॅनचा अंतर्भाग मी गुणी डिझाईनर्सकडून सजवला आहे. त्यांनी सजावट करताना माझ्या आरामाबरोबरच माझ्या व्यक्तिमत्त्वाचंही प्रतिबिंब पडेल, याची काळजी घेतली आहे. त्यातील जेवणाची जागा ही माझ्या खूप आवडीची जागा आहे. तिथे मी निवांतपणे भोजनाचा आस्वाद घेते. तसंच व्हॅनच्या एका कोपर््यात मी वाचनाची जागा तयार केली आहे. तिथे मी माझ्या आवडीची पुस्तकं आणि पटकथा आणि संवाद वाचत असते. दोन प्रसंगांच्या चित्रीकरणादरम्यान मला याच जागी थोडा आराम मिळतो. ही जागा स्वत:च्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे कारण इतक्या धावपळीच्या कारकीर्दीत शांतता मिळणं अत्यंत गरजेचं आहे. माझी ही नव्याने सजविलेली व्हॅनिटी व्हॅन ही निव्वळ जागा नाहीये, माझ्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची जपणूक करणारं ते स्थळ आहे. तिथे मिळणार््या आरामामुळे मला मालिकेत माझी सर्वोत्तम कामगिरी करता येते. त्यामुळे मला दररोज नव्या उत्साहाने काम करण्याची शक्ती मिळते. खरं म्हणजे माझ्या घरापेक्षा अधिक काळ मी या व्हॅनमध्येच व्यतीत करत असते, हे लक्षात घेतलं, तर मला ही व्हॅन माझ्या व्यक्तिमत्त्वाला आणि माझ्या अभिरुचीला साजेशी सजवायची होती.”
आपल्या व्हॅनिटी व्हॅनची अंतर्गत सजावट श्रध्दाने आपल्या आवडीनुसार केली असली, तरी निधीच्या कुटिल कारस्थानांपासून प्रीता स्वत:ला कशी वाचवेल, हे पाहणे प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरेल. करण-प्रीताची भेट कधीतरी होईल का आणि ते दोघे पुन्हा एकत्र येतील का?