no images were found
पाकिस्तानी सीमा हैदर पाचव्यांदा आई होणार?
उत्तर प्रदेश (नोएडा): पाकिस्तानातून पळून भारतात आलेली सीमा हैदर सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. सीमा हैदर पाचव्यांदा आई होणार असं बोललं जात आहे. प्रसारमाध्यमांनी सीमाला तिची गर्भधारना आणि सचिनच्या बाळाची आई होण्याबाबत प्रश्न विचारला असता, तिने यावर प्रतिक्रिया दिली आहे. सीमानेथेट उत्तर न देता ही आपली वैयक्तिक बाब असल्याचं म्हटलं आहे. पण, महत्त्वाचं म्हणजे या प्रश्नावर उत्तर देताना सीमाने प्रेगन्सीबाबतच्या चर्चांना नकार दिलेला नाही.
सीमा हैदर लवकरच तिच्या पाचव्या मुलाला जन्म देणार असल्याचं बोललं जात आहे. स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी सीमा हैदर आणि सचिन मीना यांनी नोएडामधील रबुपुरा येथे ध्वजवंदन केलं. यावेळी त्यांच्यासोबत सीमाची चार मुलं, तिचे वकील आणि सीमाचे वकील ए.पी. सिंह आणि गावकरी उपस्थित होता. यावेळी सीमाने सर्वांसोबत मिळून ‘भारत माता की जय’ अशी घोषणबाजीही केली.
दरम्यान, यावेळी प्रसारमाध्यमांनी सीमाला प्रेगन्सीबाबत विचारणा केली, त्यावेळी तिने सांगितलं की, ”गरोदर आहे किंवा नाही, ही माझी वैयक्तिक बाब आहे. जर मी काही बोलली तर नजर लागेल.”
ध्वजवंदन करताना सीमाने राष्ट्रगीत गायलं. यावेळी सीमा हैदरने केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या अशा तिरंगी रंगाची साडी नेसली होती, त्यासोबत तिरंग्याची ओढणीही डोक्यावर घेतली होती. त्यासोबतच देवी मातेची चुनरी कपाळावर बांधली होती. सीमा हैदरने पती आणि चार मुलांसह छतावर उभं राहून गावकऱ्यांसह ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या.
सीमा हैदर मे महिन्यामध्ये तिच्या चार मुलांसह कराचीहून नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात दाखल झाली. ती यूपीमधील नोएडाला पोहोचली होती. सध्या सीमा नोएडातील सचिन मीनासोबत राहत आहे. सीमाचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय आहे. त्यामुळे, तपास यंत्रणांनी दोघांनाही अनेकवेळा चौकशीसाठी बोलावलं, पण अद्याप तिच्याबाबत काहीही संशयास्पद आढळलं नाही, त्यानंतर सीमाला सचिनसोबत राहण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, सीमा हैदरवर अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.