no images were found
प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नेत्र तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन
कोल्हापूर : भारतात रस्ते अपघात ही गंभीर समस्या असून यामध्ये दरवर्षी जवळपास 1 लाख 60 हजार व्यक्ती जीव गमावतात. वाहनचालकांच्या वाहन चालविण्याच्या कौशल्यात त्यांचे संपूर्ण आरोग्य तसेच वाहन चालकाच्या दृष्टीस अनन्यसाधारण महत्व आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील वाहन चालकांचे आरोग्य व नेत्र तपासणी तसेच रस्ते सुरक्षेबाबत प्रबोधन शिबीर आयोजित करण्यात येत आहे. दि. 31 ऑगस्ट ते 02 सप्टेंबर 2023 या कालावधीत सेवा रूग्णालय, कोल्हापूर येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी कळविले आहे.
या शिबीरामध्ये जिल्ह्यातील बस चालकांची निःशुल्क आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात येणार असून शिबीराचा लाभ घेण्याकरीता वाहन चालकांना नाव नोंदणी करण्यासाठी व्हॉट्स अॅप क्र. 8999803595 हा आहे.. इच्छुक बस चालकांनी नाव, वय, मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक याची माहिती व्हॉट्स अॅपव्दारे पाठविल्यानंतर नाव नोंदणी करून घेण्यात येईल