Home राजकीय आमदार अपात्रतेवर नियमानुसार कारवाई – नार्वेकर

आमदार अपात्रतेवर नियमानुसार कारवाई – नार्वेकर

2 second read
0
0
30

no images were found

आमदार अपात्रतेवर नियमानुसार कारवाई – नार्वेकर

 

मुंबई ;-  आमदारांच्या अपात्रतेच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने दीर्घ सुनावणी घेत अपात्रतेच्या कारवाईचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देशही दिले.त्यामुळे यासंदर्भात अधिक चर्चा न करता योग्य कायदेशीर व नियमानुसार कारवाई केली जाईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संबंधित आमदारांना नोटीस बजावली, मात्र अद्याप त्यावर कारवाई झालेली नाही. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी नार्वेकरांना नोटीसची वेळ संपली असून कारवाई कधी होणार, असा प्रश्न विचारला असता त्यांनी यावर भूमिका स्पष्ट केली. राहुल नार्वेकर म्हणाले, लवकरच याबाबत सुनावणी चालू करण्यात येईल. इतर प्रक्रिया सुरू आहेत. मी आश्वासित करतो की, यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही.

आमदारांच्या अपात्रता प्रकरणात उचित कारवाई सुरू आहे. ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेत असतात त्यावेळी ते ‘क्वासी ज्युडिशियल ऑथोरिटी’ (अर्ध न्यायिक)म्हणून काम करत असतात याचे मला भान आहे.त्यामुळे यासंदर्भात अधिक चर्चा न करता योग्य कायदेशीर व नियमानुसार कारवाई केली जाईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सांगितले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…