
no images were found
आतापर्यंत ५० कोटी रुपयांचा गुटखा जप्त – अन्न व औषध प्रशासन मंत्री आत्राम
यवतमाळ :-राज्यात गुटखा बंदी असतानाही वाहतूक करून विक्री होत आहे. आतापर्यंत ५० कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला,असे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
औषधी, तेल, खाद्यपदार्थात भेसळ होत असल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, यात कुणीची गय केली जाणार नाही, असेही आत्राम म्हणाले. लोकांच्या कल्याणासाठी महायुतीचे सरकार राज्यात काम करीत आहे. वारंवार एकच व्यक्ती गुटखा तस्करीत आढळून आल्यास ‘मोक्का’ची कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री आत्राम यांनी जिल्हा दिला.
अन्न व औषध प्रशासन विभागात अधिकारी व कर्मचार्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ही पदे लवकरच भरण्यात येणार आहे. ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी टाकण्यात येणार आहे. पोलिओ मुक्तीच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू आहे. आता बुस्टर डोसही देण्यात येणार आहे, अशी माहितीही आत्राम यांनी दिली