
no images were found
पंतप्रधान मोदी चांद्रयान लँडिंग कार्यक्रमात सहभागी होणार का?
चांद्रयान २ च्या लँडिंगवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगळुरू येथून या कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहिले होते. तेव्हा चांद्रयान २ मोहिम थोडक्यासाठी अपयशी ठरली होती.
४१ दिवसांचा अंतराळ प्रवास केल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘चंद्रयान-३’चे विक्रम लँडर आज, २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. त्यासाठी इस्रोचे संशोधक सज्ज झाले असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश बनणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हा ऐतिहासिक क्षण पाहणार का असा प्रश्न उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी तीन दिवसीय दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत.
चांद्रयान २ च्या लँडिंगवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगळुरू येथून या कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहिले होते. तेव्हा चांद्रयान २ मोहिम थोडक्यासाठी अपयशी ठरली होती. परंतु, त्यावेळी इस्रोचे संचालक सिवन यांचं मोदींनी सात्वंन करत त्यांना मिठी मारली होती. आजचा हा ऐतिहासिक क्षणही पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण अफ्रिकेतून पाहणार आहेत. व्हरच्युअली या कार्यक्रमाचे ते साक्षीदार होणार आहेत.