no images were found
मतदारांना मदत व सेवा पुरवण्यासाठी 1950 टोल फ्री कमांकावर संपर्क साधा
कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्रयातील मतदारांना अधिकाधिक मदत व सेवा पुरवण्यासाठी मतदार मदत कक्षामध्ये 1950 हा टोल फ्री कमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मतदारांना मतदानासंबंधी माहिती, नावनोंदणी, नावात बदल, मतदान केंद्र, इत्यादी सर्व सेवांची माहिती व अन्य तक्रारींचे निराकरण करण्यासाठी या क्रमांकावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्या पासून आतापर्यंत जिल्हयातील दहा मतदरसंघातून 550 फोन कॉल्स आले असल्याची माहिती या कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मतदार मदत कक्षामध्ये आतापर्यत मतदार यादीत नाव नसल्याबाबत 279 फोन कॉल्स, आचार संहिता भंगाबाबत 2 फोन कॉल्स, दिव्यांगाना सुविधा पुरविण्याबाबत 5 फोन कॉल्स, मतदार यादीत चुकीचे नाव असल्याबाबत, मतदान कार्ड प्राप्त न झाल्याबाबत, मतदार यादीत चुकीचा पत्ता आल्याबाबत तसेच वय 85 पेक्षा जास्त असलेल्या ज्येष्ठ नागरीकांना मतदाना दिवशी सुविधा देण्याबाबत 264 फोन कॉल्स आले आहेत.