
no images were found
‘दूसरी मॉं’मध्ये अभिनेता ‘स्वतंत्र भारत’चा ‘शमशेरा’च्या भूमिकेत
चित्रपट, टेलिव्हिजन मालिकांमध्ये प्रभावी अभिनयासह अभिनेता स्वतंत्र भारतने मनोरंजन क्षेत्रातील सुप्रसिद्ध चेहरा म्हणून स्वत:चे नाव स्थापित केले आहे. अभिनेता आता एण्ड टीव्हीवरील कौटुंबिक मालिका ‘दूसरी मॉं’च्या कलाकारांमध्ये सामील होण्यास सज्ज आहे. तो मालिकेमध्ये शमशेराची डायनॅमिकची भूमिका साकारणार आहे, जो कुशलपणे कृष्णा (आयुध भानुशाली) व यशोदा (नेहा जोशी) यांच्या जीवनाला नवीन रोमांचक वळण देईल, तसेच मालिकेमध्ये नवीन रोचक ड्रामाची भर करेल आणि प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करेल.
मालिकेमध्ये शमशेराच्या भूमिकेत प्रवेशाबाबत स्वतंत्र भारत म्हणाला, ”माझी भूमिका शमशेरा स्थानिक गुंड आणि कबड्डी टीमचा प्रशिक्षक आहे, ज्याचे अनाथ पार्श्वभूमीमुळे कृष्णाशी दृढ नाते जुळते. आपली आई गमावल्यानंतर आणि वडिलांनी सोडून दिल्याने शमशेराने त्याच्या समुदायावर नियंत्रण ठेवण्यासाठी चुकीचा मार्ग निवडला.
काही लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता आपल्या अभिनय प्रवासाबाबत सांगताना म्हणाला, ”मी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे, तसेच टेलिव्हिजनवर विविध भूमिका देखील साकारल्या आहेत. मी फॅशन डिझाइनर म्हणून माझ्या करिअरची सुरूवात केली, पण माझ्या नशिबात अभिनेता बनणे विधिलिखित होते. अभिनयासह मी काही व्हीलॉग करतो, विविध ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेट देतो आणि संशोधनाच्या माध्यमातून रोचक माहिती शेअर करतो.”